अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या आयपीएल २०२२च्या १६व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्सला धूळ चारली. शुक्रवारी (०८ एप्रिल) ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने ६ विकेट्सने सामना खिशात घातला. तसेच हंगामातील सलग तिसरा सामना जिंकला. या सामन्याचा शेवट गुजरातचा अष्टपैलू राहुल तेवतियाने केला. त्याने केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
झाले असे की, पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत टिकत सामना जिंकला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावा हव्या होत्या. यावेळी २०वे षटक टाकत असलेला ओडियन स्मिथने (Odean Smith) पहिलाच चेंडू डेविड मिलरला (David Miller) टाकला. यावेळी धाव घेताना खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला असलेला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) धावबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आला. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकला आलेल्या मिलरने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. तसेच, चौथ्या चेंडूवर १ धाव घेत स्ट्राईक तेवतियाला दिली.
Think last-ball sixes – Miandad, Dhoni come to mind!
Think 2 sixes of the last 2 balls: pic.twitter.com/lW6ugokiO0
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
गुजरातला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूंवर अजूनही १२ धावांची गरज होती. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या तेवतियाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर खणखणीत षटकार ठोकले. अशाप्रकारे गुजरातने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. तेवतियाने मारलेल्या दोन षटकारांमुळे त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झालीये. तो षटकातील शेवटच्या २ चेंडूंवर षटकार मारत सामना जिंकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
त्याच्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचे धुरंधर एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी ही कामगिरी केली होती. धोनीने २०१६ साली पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना, तर जडेजाने २०२० साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा कारनामा केला होता.
षटकाच्या २ चेंडूंवर षटकार मारत सामना जिंकवणारे खेळाडू
एमएस धोनी (विरुद्ध पंजाब किंग्स, २०१६)
रवींद्र जडेजा (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२०)
राहुल तेवतिया (विरुद्ध पंजाब किंग्स, २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला