भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. नुकताच बुधवारी(6 जानेवारी) भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला आपले कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मात्र ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या खेळाडूने अजिंक्यच्या नेतृत्वात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. यापूर्वी तब्बल 11 भारतीय खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
अजिंक्य सर्वप्रथम भारताचा कर्णधार झाला तो 2015 आली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत झिम्बाब्वेला रवाना झालेल्या संघाचे कर्णधारपद अजिंक्यकडे देण्यात आले होते. यावेळी मनीष पांडेने अजिंक्यच्या नेतृत्वात आपले वनडे पदार्पण केले. यानंतर 3 टी 20 सामन्यांवेळी केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी ,मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा व संजू सॅमसन अशा तब्बल 6 खेळाडूंनी आपले टी 20 पदार्पण केले.
अजिंक्य कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कर्णधार झाला तो 2017 साली भारतात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे पार पडलेल्या सामन्यात अजिंक्यने युवा फिरकीपटू कुलदीप यादवला कसोटी पदार्पणाची संधी दिली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या सिडनी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिल व मोहम्मद सिराज यांनी आपले कसोटी पदार्पण केले.
आता सैनी देखील त्याचे कसोटी पदार्पण अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली करणार आहे.
रहाणेच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेले भारतीय क्रिकेटपटू –
कसोटी – कुलदीप यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
वनडे – मनिष पांडे
आंतरराष्ट्रीय टी२० – केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनिष पांडे, अक्षर पटेल, संदिप शर्मा, संजू सॅमसन
महत्त्वाच्या बातम्या –
का दिलं जातय स्मिथ आणि लॅब्यूशानेतील नात्याला ब्रोमान्सचं नाव? वाचा
“मला फोन करून सांगितले की सामना मुंबईत होईल तरी मला काही फरक पडणार नाही”
तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेने ‘या’ दोन खेळाडूंचे केले तोंडभरुन कौतुक