---Advertisement---

विराटच्या बालपणीच्या कोच म्हणतात, ‘हा’ शॉट रोहित शर्माशिवाय उत्तम कोणीही खेळत नाही

On: बुधवार, जानेवारी 6, 2021 10:54 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघाचा आक्रमक ओपनर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. रोहितने जवळ जवळ एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. रोहितचे संघात पुनरागमन झाल्यानंतर विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, रोहितच्या पुनरागमनाने संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

एका इंटरव्यू दरम्यान राजकुमार शर्मा म्हणाले, “रोहित एक महान खेळाडू असून, तो संघासोबत जोडल्याने सर्व खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढलेला असेल. भारतीय संघात इतर कोणताही खेळाडू रोहित इतका चांगला पुल व हुक शॉट खेळत नाही. रोहित डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमन करू शकतो”.

रोहित सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात परतणार असून, तो मयंक अगरवालची जागा घेईल. रोहित जवळ-जवळ एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणार आहे. भारताच्या या स्टार ओपनरकडून सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असून, त्या दृष्टीने तिसरा कसोटी सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सैनीचा सिडनी कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यामागे ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण

AUS v IND : सिडनी कसोटीत पाऊस बनू शकतोय व्हिलन, वाचा वातावरणाचा अंदाज

बापरे…! तब्बल ११ खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात केले आहे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---