दिल्ली । काल भारताची दिल्ली एक्सप्रेस आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला.
यापुढे नेहरच्या नावापुढे माजी वेगवान गोलदांज हा शब्द कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. नेहराचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हे २४ फेब्रुवारी १९९९ रोजी कोलंबो येथे श्रीलंका संघाच्या विरुद्ध झाले होते.
आशिष नेहराप्रमाणेच क्रिकेट जगतातील आणखी ६ खेळाडू आहेत जे आजही क्रिकेट खेळत आहेत किंवा राष्ट्रीय संघात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
यात सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण हे हरभजन सिंगचे झाले आहे. हरभजन सिंगचे पदार्पण २५ मार्च १९९८ रोजी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध झाले आहे.
या काळात पदार्पण झालेल्या खेळाडूंपैकी रंगाना हेराथ श्रीलंकेच्या कसोटी संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे. हरभजन सिंगला मार्च २०१६ नंतर राष्ट्रीय संघात कोणत्याच प्रकारात स्थान देण्यात आले नाही.
युवराज सिंग जून २०१७मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला आहे तर युवराजने ज्या महिन्यात पदार्पण केले त्याच महिन्यात पदार्पण करणारा शोएब मलिक पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे.
मार्लन सॅम्युएल आणि ख्रिस गेल हे सप्टेंबर महिन्यात विंडीज संघाकडून टी२० आणि वनडे सामने खेळले आहेत.
अन्य खेळाडू ज्यांनी या काळात पदार्पण केले-
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९
रंगाना हेराथ- २२ सप्टेंबर १९९९
युवराज सिंग- ०३ ऑक्टोबर २०००
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २०००