भारतीय संघ आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी 23 जूनला रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 2 टी20 सामने आणि इंग्लंडविरुद्ध 3 टी20, 3 वनडे, 5 कसोटी सामने खेळणार आहे.
या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड झालेल्या या भारतीय संघातील काही खेळाडूंनी याआधी इंग्लंड दौरा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तसेच पुढच्या वर्षी होणारा विश्वचषकही इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यादृष्टीने या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हे खेळाडू करत आहेत पहिल्यांदाच इंग्लंड दौरा:
1. केएल राहुल: मागील काही महिन्यांपासून केएल राहुल सातत्य पूर्ण कामगिरी करत आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली होती.
भारताकडून 24 कसोटी सामने खेळलेला राहुल पहिल्यांदाच इंग्लंड दौरा करणार आहे. त्याने आत्तापर्यंत भारतीय संघात मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग केला आहे.
राहुलने आत्तापर्यंत भारताकडून 10 वनडे आणि 15 टी20 सामने खेळले आहेत. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शतक करणारा भारताचा तिसराच फलंदाज आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला भारताच्या मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळू शकते.
2. हार्दिक पंड्या: भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात हार्दिक पंड्याने आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्याच्याकडून पहिल्यांदाच करत असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही चांगल्या कामगिरीची सर्वांना आपेक्षा आहे.
याबरोबरच इंग्लंडमधे तळातील त्याच्या आक्रमक फलंदाजीचा भारतीय संघाला चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच त्याला फिनिशरचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
इंग्लंडमध्ये मागीलवर्षी झालेल्या चॅम्पियम्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हार्दिकने अर्धशतक केले होते. त्यामुळे यावेळीही त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
युजवेंद्र चहल: 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक विकेट घेणारा युजवेंद्र चहलही पहिल्यांदाच इंग्लंड दौरा करत आहे. त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चांगली कामगिरी झाली होती.
त्यामुळे त्याची गोलंदाजी या इंग्लंड दौऱ्यातही महत्त्वाची ठरणार आहे. त्याने आत्तापर्यंत भारताकडून खेळताना 23 वनडे सामन्यात 43 विकेट्स आणि 21 टी20 सामन्याच 35 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच तो मागील काही मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून समोर येत आहे. त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा आहे.
जसप्रीत बुमराह: भारताच्या सध्याच्या गोलंदाजी फळीतील महत्त्वाचा गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहकडे बघितले जात आहे.
शेवटच्या षटकात त्याचे यॉर्कर्स फलंदाजांना संघर्ष करायला लावत आहेत. त्याचीही दक्षिण आफ्रिकेतील गोलंदाजी चांगली झाली होती. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे.
119 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या बुमराहकडे या इंग्लंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तसेच आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बुमराहकडे त्याच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
सिद्धार्थ कौल: यावर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून दमदार कामगिरीने सिद्धार्थ कौलने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच मागील दोन मोसमात त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी झाली आहे.
तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला होता. त्याने 17 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.
या कामगिरीच्या जोरावर त्याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे आणि तेही थेट इंग्लंड दौऱ्यासाठी. त्यामुळे त्याची या इंग्लंड दौऱ्यात कशी कामगिरी होते याकडे 2019च्या विश्वचषकाच्या दृष्टीने निवड समितीचेही लक्ष असेल.
वाचा-
–मुंबई क्रिकेट सफरनामा भाग -४ सिंहासनाकडे वाटचाल…
महत्त्वाच्या बातम्या:
–टेन्शनमध्ये असलेल्या केएल राहुलला विराट-अनुष्काने केली अशी मदत!
–आपण जर आयपीएल फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी!