जगप्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सहसा फलंदाज जोरदार फटकेबाजी करताना दिसतात. दरम्यान त्यांना परिस्थितीनुसार संथ फलंदाजीही करावी लागते. यामुळे सर्वाधिक चेंडूंचा सामना करताना अमुक धावा करण्याचा विक्रम कित्येक फलंदाजांच्या नावावर होतो. युएईत चालू असलेल्या आयपीएल २०२०मधील एका फलंदाजाने हाच अनोखा विक्रम केला आहे. हा फलंदाज म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ‘केएल राहुल’ होय.
रविवारी (१ नोव्हेंबर) अबु धाबीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलला २७ चेंडूत फक्त २९ धावा करता आल्या. परंतु यासह आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात ५१८ चेंडूंचा सामना करताना ६७० धावा केल्या आहेत. यामुळे तो एका हंगामात ५००पेक्षा जास्त चेंडू खेळणारा ५वा खेळाडू ठरला आहे.
या विक्रमाच्या यादीत विराट कोहली अव्लल स्थानावर आहे. त्याने आयपीएल २०१६मध्ये सर्वाधिक ६४० चेंडू खेळत ९७३ धावा केल्या होत्या. तर माइकल हसीने २०१३ साली ५६६ चेंडूंचा सामना करत ७३३ धावा केल्या होत्या. तसेच डेविड वॉर्नर आणि केन विलियम्सन यांनीही हा अनोखा पराक्रम केला आहे.
शिवाय केएल राहुलची दर हंगामातील फलंदाजी आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. २०१३ साली आयपीएलमध्ये पाऊल ठेवलेल्या राहुलने २०१८ ला पंजाब संघात प्रवेश केला. त्यानंतर प्रत्येक हंगामात तो पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
२०१८मध्ये राहुलने पंजाबकडून १४ सामने खेळत सर्वाधिक ६५९ धावा केल्या होत्या. तर २०१९मध्ये १४ सामन्यात ५९३ धावांची नोंद केली होती. तसेच यावर्षीही आतापर्यंत त्याने ६७० केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त २००८ साली शॉन मार्शने पंजाबकडून सर्वाधिक ६१६ धावा केल्या होत्या. तसेच ग्ले मॅक्सवेलनेही २०१४मध्ये ५५२ धावांची कामगिरी केली होती.
एका हंगामात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे फलंदाज
विराट कोहली- ६४० चेंडू, ९७३ धावा (वर्ष २०१६)
मायकल हसी- ५६६ चेंडू, ७३३ धावा (वर्ष २०१३)
डेविड वॉर्नर- ५६० चेंडू, ८४८ धावा (वर्ष २०१६)
केन विलियम्सन- ५१६ चेंडू, ७३५ धावा (वर्ष २०१८)
केएल राहुल- ५१८ चेंडू, ६७० धावा (वर्ष २०२०)
महत्त्वाच्या बातम्या-
“तीन पराभवानंतर सलग 3 सामने जिंकूही शकतो”, बेंगलोरच्या दिग्गजाला आहे विश्वास
भारतीय कर्णधार असलेल्या संघांनी करावा प्लेऑफमध्ये प्रवेश, पाहा कोण म्हणतंय असं
ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांच्या एका चुकिमुळे क्रिकेट बोर्ड नाराज
ट्रेंडिंग लेख-
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण