रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मागच्या वर्षी देखील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी उभय संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. मालिकेतीस पाचवा आणि शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव रद्द केला गेला होता, जो यावर्षी खेळला जाणार आहे. भारताविरुद्ध १ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे.
मागच्या वर्षीच्या चार कसोटी सामन्यांमध्ये देखील जेम्स अँडरसन (James Anderson) मुळे भारतीय संघाचा घाम निघाला होता. यावर्षीच्या एकमात्र कसोटी सामन्यात देखील तो भारतीय खेळाडूंसमोरची सर्वात मोठी बाधा ठरू शकतो. दरम्यान अँडरसन इंग्लंडचा एक दिग्गज गोलंदाज आहेच, पण त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत, जे आजही अबाधित आहेत. असाच एक विक्रम म्हणजे त्याने भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकांमध्ये इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. चला तर नजर टाकुयात उभय संघात यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकांमध्ये कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज
जेम्स अँडरसन –
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स ह्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने घेतल्या आहेत. अँडसनने भारताविरुद्ध तब्बल १३३ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. ३९ वर्षीय अँडरसन मागच्या मोठ्या काळापासून इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत आहे आणि आजही इतर कोणत्याही गोलंदाजपेक्षा जास्त प्रभाव देखील त्याचाच आहे.
भागवत चंद्रशेखर –
दिग्गज भागवत चंद्रशेखर हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघाचे एकेकाळचे महान लेग स्पिनर राहिले आहेत. सन १९६३ ते १९७९ दरम्यान त्यांनी भारतीय संगाचे प्रतिनिधित्व केले. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल ९५ विकेट्स घेतल्या.
अनिल कुंबळे –
अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळे भारतीय संघाचे आणि आयपीएलमध्ये स्वतःच्या संघाचे नेतृत्व करून बसले आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळळेल्या सर्व कसोटी सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर ९२ विकेट्सची नोंद आहे.
रविचंद्रन अश्विन –
सध्याच्या भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून सर्वांना माहिती असेलला रविचंद्रन अश्विन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८८ विकेट्स घेतल्या आहेत.
बिशन सिंग बेदी –
जेव्हा कधी भारताच्या महान फिरकी गोलंदाजांचा उल्लेख होत असेल, तर त्यामध्ये बिशन सिंग बेदी यांचे नाव नक्कीच घेतले जाते. त्यांनी या यादीत पाचवा क्रमांका पटकावला आहे. बेदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध एकूण ८५ विकेट्स घेतल्या आहेत.
कपिल देव –
भारतीय संघाला पहिला आयसीसी विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देवचे नाव या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांचे आकडे खूपच उत्कृष्ट आहेत. त्यांनी या संघाविरुद्ध तब्बल ८५ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
स्टुअर्ट ब्रॉड –
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. सध्या इंग्लंड संघाच्या सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक म्हणजे ब्रॉड आहे आणि अजून देखील क्रिकेटमध्ये सक्रिय क्रिकेटमध्ये सहभाग घेतो. त्याने भारताविरुद्ध खेळलेले सर्व कसोटी सामने मिळून ७१ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफीची फायनल पहिल्यांदा खेळणाऱ्या ‘या’ जोडीने काढला मुंबईचा घाम!