आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात अनेक मोठे धमाके पाहायला मिळणार आहेत. या लिलावात अनेक मोठे खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात. याशिवाय, लिलावात अशा खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडू शकतो, ज्यांना आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात कोणीही खरेदी केलं नव्हतं. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
(1) सरफराज खान – या यादीत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान अव्वल स्थानावर आहे. आयपीएल 2024 च्या लिलावात सरफराजची मूळ किंमत 20 लाख रुपये होती, तरीही त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही. मात्र त्यानंतर त्यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण करत शानदार कामगिरी केली. त्यामुळे आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
(2) स्टीव्ह स्मिथ – आयपीएल 2024 मध्ये विकला न गेलेला आणखी एक मोठा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ. त्याच्यावर 2025 च्या आयपीएल मेगा लिलावात पैशांचा वर्षाव होऊ शकतो. स्मिथनं त्याच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन फ्रीडमला 2024 मेजर लीग टी20 मध्ये चॅम्पियन बनवलं होतं. याशिवाय त्यानं फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली होती. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा संयुक्त दुसरा फलंदाज ठरला होता.
(3) जोश इंग्लिश – ऑस्ट्रेलियाचा शानदार यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसलाही आयपीएल 2024 मध्ये कोणताच खरेदीदार मिळाला नव्हता. तेव्हा त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र, यावेळी त्याच्यावर पैशांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
(4) तबरेझ शम्सी – दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकीपटू तबरेझ शम्सीलाही आयपीएल 2024 मध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यानंतर या फिरकीपटूनं टी20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली. त्यामुळे आयपीएल 2025 च्या लिलावात त्याच्यावर चांगली बोली लागू शकते.
हेही वाचा –
समालोचकाला दिवसाला मिळतो चक्क इतका पगार? आकाश चोप्राचा मोठा खुलासा
नासिर हुसैन यांची ही कसली सर्वोत्तम एलेव्हन? संघात केवळ एकाच भारतीयाचा समावेश!
स्टार सलामीवीरचे टीम इंडियात पुनरागमन? शुबमन गिलच्या जागी वर्णी!