टी20 विश्वचषक 2024 च्या साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. अखेरचा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला.
पहिल्या फेरीनंतर 20 पैकी 12 संघ स्पर्धेतून बाहेर पडले असून, 8 संघांनी सुपर-8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 मध्ये पोहोचले आहेत. या 8 संघांपैकी भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ असे आहेत, ज्यांना आतापर्यंत पराभवाचा सामना करावा लागला नाही.
अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाज हा साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर त्याच्याच देशाच्या फजलहक फारुकीनं सर्वाधिक बळी घेतले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, या दोन्ही यादीत टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही! साखळी टप्प्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रिषभ पंत होता, जो 94 धावांसह क्रमवारीत 18व्या स्थानी आहे.
साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रहमानउल्ला गुरबाज – 167 धावा, 41.75 सरासरी, 150.45 स्ट्राईक रेट
मार्कस स्टॉयनिस – 156 धावा, 78.00 सरासरी, 190.24 स्ट्राईक रेट
इब्राहिम झद्रान – 152 धावा, 38.00 सरासरी, 124.59 स्ट्राईक रेट
ट्रॅव्हिस हेड – 148 धावा, 49.33 सरासरी, 157.45 स्ट्राईक रेट
फलंदाजीप्रमाणेच अफगाणिस्तानच्या गोलंदाजींनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. फजलहक फारुकी हा 12 विकेट्ससह साखळी टप्प्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही गोलंदाजानं 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले नाहीत. साखळी टप्प्यात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग होते, ज्यांनी प्रत्येकी 7 बळी घेतले. हे दोन्ही खेळाडू या क्रमवारीत अनुक्रमे 13व्या आणि 14व्या स्थानावर आहेत.
साखळी फेरीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
फजलहक फारुकी – 12 विकेट, 6.67 सरासरी
ट्रेंट बोल्ट – 9 विकेट, 6.56 सरासरी
अकील हुसेन – 9 विकेट, 6.89 सरासरी
ॲनरिक नॉर्किया - 9 विकेट, 7.78 सरासरी
तन्झीम हसन साकिब – 9 विकेट, 8.00 सरासरी
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेंट बोल्टचा टी20 विश्वचषकाला निरोप! अखेरच्या सामन्यात केली जबरदस्त गोलंदाजी
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले
लॉकी फर्ग्युसन टी20 क्रिकेटमध्ये 4 मेडन ओव्हर्स टाकणारा दुसरा गोलंदाज! जाणून घ्या पहिला कोण होता?