इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या नावावर एकापेक्षा एक विक्रम केले आहेत. जसे की, विराट कोहली याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 7000हून अधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेल याने सर्वाधिक 357 षटकार मारले आहेत. तसेच, शिखर धवन याने सर्वाधिक 750 चौकार मारले आहेत. असाच एक विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्या नावावरही आहे. त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा सलग सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.
दिनेश कार्तिकचा विक्रम
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा सलग सामने खेळण्याचा विक्रम दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या नावावर आहे. कार्तिकने 2008 ते 2023 यादरम्यान सलग 233 आयपीएल सामने खेळले आहेत. कार्तिकनंतर दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. त्याने 2009 ते 2020 यादरम्यान सलग 165 आयपीएल सामने खेळले आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी एमएस धोनी (MS Dhoni) असून त्याने 2010 ते 2019 यादरम्यान सलग 151 आयपीएल सामने खेळले आहेत.
एमएस धोनी याच्यानंतर पुढचा क्रमांक सुरेश रैना याचा लागतो. रैनाने 2008 ते 2018 यादरम्यान सलग 143 आयपीएल सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी विस्फोटक फलंदाज विराट कोहली आहे. विराटने 2008 ते 2016 यादरम्यान सलग 129 आयपीएल सामने खेळले आहेत. अशाप्रकारे रोहित, धोनी, रैना आणि विराटलाही न जमणारा विक्रम दिनेश कार्तिक याने करून दाखवला.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा सलग सामने खेळणारे खेळाडू
233 सामने- दिनेश कार्तिक (2008 ते 2023)
165 सामने- रोहित शर्मा (2009 ते 2020)
151 सामने- एमएस धोनी (2010 ते 2019)
143 सामने- सुरेश रैना (2008 ते 2018)
129 सामने- विराट कोहली (2008 ते 2016)
नुकतेच 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल 2023चा 65वा सामना पार पडला. मात्र, या सामन्यात दिनेश कार्तिक याला संधी मिळाली नव्हती. तसेच, 2008मध्ये केकेआरविरुद्ध तो एक सामना खेळला नव्हता. मात्र, नंतर सलग 233 सामने खेळला.
आयपीएल 2023 स्पर्धेत कार्तिकने 12 सामने खेळताना 12.73च्या सरासरीने 140 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Players with most consecutive matches in IPL history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी एकटा बोर झालेलो…’, ख्रिस गेलने आपल्या खास क्लबमध्ये केले विराटचे स्वागत
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीबाबत सहाय्यक कोच वॉटसनचे खळबळजनक भाष्य; काय म्हणाला लगेच वाचा