---Advertisement---

खेळाडूंचे भविष्य घडवणाऱ्या धोनीच्या नेतृत्वात पदार्पण करून ‘या’ खेळाडूंचे करिअर मात्र गंडलं, पाहा यादी

On: रविवार, जून 12, 2022 5:40 PM
MS-DHONI-YOUNGSTER
---Advertisement---

भारतीय संघासाठी अनेक आजवर कर्णधार झाले आहेत. मात्र, सध्याच्या कालावधीत महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून नावाजले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला अनेक हिरे मिळाले आहेत. रोहित शर्मा विराट कोहली, रविंद्र जडेजा ही असीच काहीशी नावे आहेत. मात्र, असेही काही खेळाडू आहेत ज्यांना धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली मात्र, थोड्याच कालावधीत हे खेळाडू विश्व क्रिकेटमधून नामशेष झाले.

१. मनदीप सिंग (Mandeep Singh)

Mandeep-Singh
Photo Courtesy : Twitter

मनदीप सिंगने आयपीएलमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने २०१६ साली झिम्बाब्वे विरुद्ध एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेत मनदीप सिंगला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने ४३.५ च्या सरासरीने ८७ धावा केल्या. मात्र या मालिकेनंतर त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. मनदीप सिंगला आयपीएलमध्ये संधी मिळाली, जिथे त्याने १०८ सामने खेळले आणि २१.४ च्या सरासरीने १६९२ धावा केल्या.

२. बरिंदर सरन (Brinder Sran)

Brinder-Sran
Photo Courtesy : Twitter

बरिंदर सरनने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याने टीम इंडियासाठी ६ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळले. काही 8 सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियामध्ये संधी मिळू शकली नाही किंवा म्हणा की, तो टीम इंडियातील आपली जागा टिकवून ठेवू शकला नाही. सरनने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५.३४ च्या इकॉनॉमी रेटने ७ विकेट घेतल्या, तर टी२०मध्ये त्याने २ सामन्यांमध्ये ५.१२ च्या इकॉनॉमी रेटने ६ विकेट घेतल्या. याशिवाय त्याने आयपीएलच्या २४ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत.

 

३. मनप्रीत सिंग गोनी (Manpreet Singh Gonny)

Manpreet-Singh-Gony
Photo Courtesy : Twitter

मनप्रीत सिंग गोनीने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशा संधी मिळाल्या नाहीत. तो टीम इंडियासाठी फक्त २ एकदिवसीय सामने खेळला, जिथे त्याने ५.८४ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना २ विकेट घेतल्या. याशिवाय त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली आणि २००८ ते २०१७ पर्यंत त्याने ४४ सामन्यांत ८.६९ च्या इकॉनॉमी रेटने ३७ विकेट घेतल्या. मनप्रीत सिंगला टीम इंडियामध्ये आपले स्थान टिकवून ठेवता आले नाही आणि या कारणास्तव तो संघाबाहेर होता आणि २०१९  मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

४. फैज फजल (Faiz Fazal)

Faiz-Fazal
Photo Courtesy : Twitter

फैज फजलने २०१६ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी न मिळाल्याने तो केवळ एकच सामना खेळून बेनामी झाला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात ५५ धावा केल्या होत्या. याशिवाय आयपीएलमध्येही त्याला फारशी संधी मिळाली नाही. फैजने आयपीएलमध्ये केवळ १२ सामने खेळले आणि १८.३ च्या सरासरीने १८३ धावा केल्या.

५. अभिनव मुकुंद (Abhinav Mukund)

Abhinav-Mukund
Photo Courtesy : Twitter

अभिनव मुकुंद हा देखील एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. अभिनव मुकुंद देखील टीम इंडियासाठी बरेच सामने खेळू शकला नाही, केवळ ७ कसोटी सामने खेळल्यानंतर तो टीम इंडियासाठी अज्ञात बनला. मुकुंदने या ७ कसोटी सामन्यात २२.९ च्या सरासरीने ३२० धावा केल्या. तसे, मुकुंदची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी विशेष नव्हती, ज्यामुळे तो टीम इंडियातील स्थान टिकवू शकला नाही. त्याला आयपीएलमध्येही संधी देण्यात आली आणि तिथेही तो जवळपास फ्लॉप ठरला. अभिनव मुकुंदने २००८ ते २०१३ दरम्यान फक्त ३ सामने खेळले आणि ९.५च्या सरासरीने फक्त १९ धावा काढल्या.

दरम्यान, यांपैकी अनेक खेळाडू असे आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीच सोनं करता आलेल नाही. त्यामुळे त्यांना संघातून बाहेर रहावे लागले. मात्र, याउलट विचार केल्यास बहुतांश खेळाडू असे आहेत ज्यांना धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये संधी दिली आणि त्या खेळाडूंनी मिळेलेल्या संधीचे सोने केले. आणि आजही ही नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकुळ घालत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आर्यन भुजबळ, रोनित मुथा, रोहन नागर यांची आगेकूच

पाळणा हालला! आरसीबीच्या माजी खेळाडूच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने मुलाला दिला जन्म

कोर्टाने निर्णय दिला अन् महाराष्ट्रातील आयपीएल मॅचेस शिफ्ट केल्या गेल्या, काय होता तो किस्सा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---