भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता दुसऱ्या वनडे समान जिंकून भारतीय संघ ही मालिका आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बाब म्हणजे, संघाचा उपकर्णधार केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. चला तर पाहूया अशी असू शकते दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन. (playing 11 of Indian team for second odi)
भारतीय संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला गेल्या ६ महिन्यापासून भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. तर दीपक हुड्डाला दुसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित शर्माने यापूर्वी देखील म्हटले आहे की, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला एकत्र खेळवायचं आहे.
तसेच सलामीवीर फलंदाज केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याने देखील सराव करायला सुरुवात केली आहे. असे झाल्यास ईशान किशन संघाबाहेर जाऊ शकतो. कुलदीप यादव सह, दिपक चाहरला देखील प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज हे प्लेइंग ईलेव्हेनमध्ये कायम राहू शकतात.
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा/कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर/दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या :
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण
“मी त्यांना लताजी म्हटले, तर त्यांनी मला ‘आई’…” शोएब अख्तरने दिली भावनिक श्रद्धांजली
रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळणार पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली? जाणून घ्या सविस्तर