जगभर कोरोना व्हायरसचा धोका वाढत असतानाच आता भारतातसुद्धा कोरोनाव्हायरसचे 60 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक स्पर्धा, कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्यातच 29 मार्चपासून आयपीएल सुरु होत आहे. पण आयपीएलच्या आयोजनावरही सध्या टांगती तलवार आहे.
यावर्षी 29 मार्च ते 24 मे दरम्यान बीसीसीआयने आयपीएलचे सामने आयोजित करू नयेत असा आदेश केंद्र सरकारने बीसीसीआयला द्यावा यासाठी वकील अॅलेक्स बेन्झिगर यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे आणि यामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत आहे. अशा स्थितीत आयपीएलचे सामने आयोजित केल्यास कोरोनाव्हायरसचा धोका वाढू शकतो.
याचिकाकर्त्याने म्हटले आहे की “आजपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळानुसार COVID-19 ला प्रतिबंध किंवा उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध तयार झालेले नाही.”
याआधीच कर्नाटक सरकारने बेंगळुरुमध्ये आयपीएलचे सामने आयोजित करण्यास मनाई केलेली आहे.
जगभर कोरोनाव्हायरसचा धोक्यामुळे सुप्रसिध्द क्लब फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगचे सामने सुद्धा प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. तसेच नुकतीच इंडियन वेल्स ही टेनिस स्पर्धाही यावर्षी रद्द केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–३९ वर्षीय मोहम्मद कैफने पकडला भन्नाट झेल, चाहत्यांना आठवले जूने दिवस!






