---Advertisement---

पदकं खेळाडूंनी जिंकलीत की मोदींनी?; पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ गोष्टीमुळे ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची नाराजी

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 2:39 PM
---Advertisement---

मागील दोन आठवडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टोकियो ऑलिंपिक्स २०२० या खेळांच्या महाकुंभाचा रविवारी (८ ऑगस्ट) समारोप झाला. त्यानंतर सोमवारी सर्व सहभागी खेळाडू मायदेशी परतले आहेत. नवी दिल्लीतील विमानतळावर मोठ्या थाटामाटात या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पदक जिंकून देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंसाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात होता. मात्र खेळाडूंपेक्षा जास्त या सोहळ्यासाठी मंचावर लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.

त्याचे झाले असे की, ऑलिंपिक्समध्ये पदकांची कमाई केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजण्यात आला होता. यावेळी मंचावर खेळाडूंचे फोटो असलेला मोठा बॅनर लावण्यात आला होता. पण या बॅनरवर खेळाडूंच्या फोटोंपेक्षा जास्त मोठ्या आकारात भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अपार कष्टांनंतर पदके जिंकणाऱ्या खेळाडूंपेक्षा पंतप्रधान मोदींना अधिक महत्त्व दिले जात असल्याचा खोचक टोला अनेकांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेत्यांसह अगदी ऑलिंपिक विजेत्या खेळाडूनेही यावर निराशा दर्शवली आहे. ऑलिंपिक पदक विजेता विजेंदर सिंगने याबद्दल ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने ‘हे सर्वकाही पीआरचे आहे आणि पीआरच सर्वकाही आहे,’ असा टोला लगावला आहे.

https://twitter.com/boxervijender/status/1424760140939468804?s=20

https://twitter.com/srinivasiyc/status/1424721091126185989?s=20

https://twitter.com/srinivasiyc/status/1424772972628242433?s=20

https://twitter.com/Jeetesh23/status/1424721944507674625?s=20

दरम्यान यावर्षीचे ऑलिंपिक भारतासाठी अतिशय विशेष राहिले आहे. तब्बल ७ पदकांची कमाई करत भारताने आपलाच सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिंपिक्समध्ये भारताने सर्वाधिक ६ पदकांची कमाई केली होती.

टोकियो ऑलिंपिक २०२० चे पदक विजेते खेळाडू
१) नीरज चोप्रा (भालाफेकपटू) – सुवर्ण पदक
२) मीराबाई चानू (वेटलिफ्टर)– रौप्य पदक
३) रवी दहिया (कुस्तीपटू) – रौप्य पदक
४) पीव्ही सिंधू (बॅडमिंटनपटू)– कांस्य पदक
५) लवलिना बोर्गोहेन (बॉक्सर)– कांस्य पदक
६) बजरंग पुनिया (कुस्तीपटू)– कांस्य पदक
७) भारतीय पुरुष हॉकी संघ – कांस्य पदक

महत्त्वाच्या बातम्या-

‘नीरज’ नावाच्या व्यक्तींची लॉटरी! गोल्ड मोडलिस्ट चोप्राच्या विजयावर ‘हा’ पेट्रोल पंप मालक वाटतोय फ्री पेट्रोल

अबब! भारत सरकारने गोल्ड मेडलिस्ट नीरजवर खर्च केलाय ‘इतका’ पैसा, प्रशिक्षकाचाच पगार कोटींच्या घरात

ऑलिम्पिक स्पर्धेत ‘या’ द्रोणाचार्यांनी केलेल्या मेहनतीला आले अखेर यश; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---