---Advertisement---

कौतुकास्पद!! थेट पंतप्रधान कार्यालयातून झाले भारतीय हॉकी संघाचे कौतुक, थेट पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

---Advertisement---

गुरुवार (५ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघासाठी खूप मोठा दिवस आहे. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाला गवसणी घालत ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. भारतीय पुरुष संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत करत हा मोठा कीर्तीमान आपल्या नावावर केला. हा विजय मिळवल्यानंतर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग सोबत फोन कॉलवरून संवाद साधून त्याला शुभेच्छा दिल्या.

भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कर्णधार मनप्रीत सिंग, प्रशिक्षक ग्राहम रीड आणि सहाय्यक प्रशिक्षक पियूष दुबे यांच्याशी संवाद साधला.

नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन कॉल करून म्हटले की, “खूप खूप अभिनंदन, संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. सर्वं खेळाडूंचे खूप अभिनंदन..” यावर मनप्रीत सिंगने प्रतिक्रीया देत “तुमची प्रेरणा खूप उपयोगी पडली सर…” असे म्हटले.(Pm modi talks to Indian men hockey team captain Manpreet Singh and coach)

प्रशिक्षकांसोबत देखील साधला संवाद
नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षक रीड यांच्यासोबत देखील संवाद साधला. त्यांनी हा मोठा कारनामा केला म्हणून त्यांचे मोदींनी अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, “ऐतिहासिक! हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकाला लक्षात राहील. कांस्य पदक पटकावल्यामुळे पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. यासह त्यांनी संपूर्ण भारतीयांना विशेषतः तरूणांना मंत्रमुग्ध केले आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.”

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील दिल्या शुभेच्छा 
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील भारतीय खेळाडूंना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करत असलेले बिरेंद्र लाकडा आणि अमित रोहित दास हे दोघेही ओडिसाचे आहेत. नवीन पटनायक यांनी व्हिडिओ कॉलवर म्हटले की, “भारतीय संघाचे खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला आहे, अर्थातच ओडिसाही. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आम्ही सर्व येत्या १६ तारखेला हॉकी संघाची भेट घेणार आहोत. सर्व खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा..”

महत्त्वाची बातमी-

दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्‍यात झाला पराभूत

टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव

क्या बात! टोकियो ऑलिंपिक्समधील ‘ही’ एँकर दिसते खूपच सुंदर; माहीच्या रांचीतला आहे जन्म

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---