टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत भारताचे मनोबल वाढवले आहे.
मोदींनी ट्वीट करत म्हटले की, “जय आणि पराजय हा जीवनाचा एक भाग आहे. टोकियो २०२० मधील आमच्या पुरुष हॉकी संघाने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि तेच महत्त्वाचे आहे. संघाला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे.” (PM Narendra Modi Praise Indian Hockey Team)
Wins and losses are a part of life. Our Men’s Hockey Team at #Tokyo2020 gave their best and that is what counts. Wishing the Team the very best for the next match and their future endeavours. India is proud of our players.
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
उपांत्य सामन्यात बेल्जियमचा सामना करत असलेल्या भारतीय संघ पहिल्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला ०-१ ने पिछाडीवर राहिला होता. जागतिक चॅम्पियन बेल्जियमकडून लोईक लुईपेर्टने पहिल्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती.
यानंतर पुनरागमन करत भारताने सामन्याच्या ७ व्या मिनिटाला गोल करत १-१ ने बरोबरी साधली होती. यानंतर लगेच ८ व्या मिनिटाला दुसरा गोल करत बेल्जियमवर २-१ ने आघाडी घेतली होती.
आतापर्यंत या ऑलिंपिकमध्ये पेनल्टी कॉर्नरवर केवळ एक गोल खाणाऱ्या बेल्जियमविरुद्ध हरमनप्रीत सिंगने शानदार गोल केला. यानंतर पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगनेही शानदार मैदानी गोल करत भारताला २-१ ने आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुर्जंत सिंगच्या चुकीमुळे १८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने बेल्जियमविरुद्ध बचाव करत आपली आघाडी कायम राखली होती. मात्र, एका मिनिटानंतर बेल्जियमला मिळालेल्या ५ व्या पेनल्टी कॉर्नरवर अलेक्झांडर हेंड्रिक्सने स्कोर २-२ ने बरोबरीवर आणला. हा त्याचा टोकियो ऑलिंपिक्समधील १२ वा गोल आहे.
उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पहिला हाफ संपण्यापर्यंत २-२ अशी बरोबरी साधली होती.
टोकियो २०२० मध्ये पुरुष हॉकी उपांत्य सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २-२ ने बरोबरी साधल्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय हॉकी संघ आणि बेल्जियममध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. भारताला आपला ५ वा पेनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र, गोल करण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर स्कोर २-२ ने बरोबरीत होता.
या सामन्यात शेवटच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला तिसरा गोल करण्यात यश आले होते. सामन्यात ४९ व्या मिनिटाला अलेक्झांडर हेंड्रिक्सने आपल्या संघाला ९ व्या पेनल्टी कॉर्नरला गोल करत आपल्या संघाला ३-२ ने आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे आता त्याने पहिल्याच ऑलिपिक्समध्ये आपला १३ वा गोल केला होता.
शेवटच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला ५२ व्या आणि ५३ व्या मिनिटात सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. त्यावर भारतीय गोलकीपर श्रीजेशने जोरदार बचाव केला होती. मात्र, पाचवा कॉर्नर जेव्हा पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदलला, तेव्हा तोही फेल ठरला होता. यानंतर अलेक्झांडर हेंड्रिक्सने १४ वा गोल करत स्कोर ४-२ असा केला होता.
दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या खराब खेळी आणि एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नरमुळे त्यांचे ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न तुटले.
रिओ ऑलिंपिक्स २०१६चा रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने हा सामना ५-२ ने खिशात घालत दुसऱ्यांदा ऑलिंपिक्समध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. बेल्जियमच्या विजयाचा शिल्पकार अलेक्झांडर हेंड्रिक्स राहिला. त्याने सामन्यात हॅट्रिक गोल करत आपल्या पहिल्याच ऑलिंपिक्समधील १४ गोल पूर्ण केले.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर
-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव