पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व सोलिंको यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-आयकॉन- सोलिंको ओम दळवी मेमोरीयल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत रेयांश गुंड, ओवी मारणे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत रेयांश गुंडने चौथ्या मानांकित अद्विक झाचा 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत बिगरमानांकित ओवी मारणे हिने तिसऱ्या मानांकित वान्या अग्रवालचा 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
विराज खानविलकर वि.वि.अहान जैन 5-3;
देव मूर्ती वि.वि. इशान जोशी 5-3;
अवधूत निलाखे वि.वि.रेयांश गुंड(3) 5-0;
ऋषभ ए. वि.वि.अर्जुन पाटोळे 5-1;
10 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
देवांशी पडिया वि.वि.जान्हवी सावंत 6-1;
ओवी मारणे वि.वि.वान्या अग्रवाल (3) 6-2;
8 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
रेयांश गुंड वि.वि.अद्विक झा (4)6-2;
आदित्य उपाध्ये वि.वि.आनंद कामत 6-1;
8वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
समायरा ठाकूर वि.वि.देवहुती चव्हाण 6-0;
इश्ना नायडू (3) वि.वि.वंशिका अरगडे 6-3;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय; मुंबईचा विजयी चौकार
नादच खुळा! 11 वर्षीय चिमुकल्याच्या बॉलिंगचा रोहित बनला फॅन, नेट्समध्ये केला त्याचा सामना