पुणे।पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत बीआयपीएल रायजिंग ईगल्स व टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज या संघांनी अनुक्रमे पीईएसबी रोअरींग लायन्स व मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाने पीईएसबी रोअरींग लायन्स संघाचा 40-38 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून वैष्णवी शिंदे, अभय नागराजन, अर्णव पापरकर, रिया वाशिमकर, दक्ष अगरवाल यांनी अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात देवांशी प्रभुदेसाई, अर्चित धूत, आकांक्षा अग्निहोत्री, आशी छाजेड, अनमोल नागपुरे, यशराज दळवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज संघाने मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्सचा 43-36असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बीआयपीएल रायजिंग ईगल्स वि.वि.पीईएसबी रोअरींग लायन्स 40-38(एकेरी: 10वर्षाखालील मुली: वैष्णवी शिंदे वि.वि.आस्मि आडकर 4-2; 10वर्षाखालील मुले: अभय नागराजन वि.वि.अमन शहा 4-1; 12वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि.आस्मि आडकर 1-6; 12वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर वि.वि.आदित्य भटेवर 6-1; 14वर्षाखालील मुली: रिया वाशिमकर वि.वि.सिया देशमुख 6-1;14 वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल वि.वि.जैष्णव शिंदे 6-3; 16वर्षाखालील मुली: मोहिनी घुले पराभूत वि.आर्या पाटील 3-6; 16वर्षाखालील मुले: परितोष पवार पराभूत वि.अथर्व आमरुळे 4-6; मिश्र दुहेरी: आदित्य राय / गौतमी खैरे पराभूत वि.अननमय उपाध्याय / सोनल पाटील 2-6; मिश्र दुहेरी: ओम काकड / मोहिनी घुले पराभूत वि.अथर्व आमरुळे 4-6);
टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज वि.वि.मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स 43-36(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांशी प्रभुदेसाई वि.वि.मृणाल शेळके 4-0; 10वर्षाखालील मुले: अर्चित धूत वि.वि.दक्ष पाटील 4-0; 12वर्षाखालील मुली: आकांक्षा अग्निहोत्री वि.वि.जुई काळे 6-3; 12वर्षाखालील मुले: आरुष मिश्रा पराभूत वि. नील जोगळेकर 1-6; 14वर्षाखालील मुली: आशी छाजेड वि.वि.एंजल भाटिया 6-0; 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि.क्रिस नासा 6-5(4);16वर्षाखालील मुली: वैष्णवी आडकर पराभूत वि.रिया भोसले 2-6; 16वर्षाखालील मुले: यशराज दळवी वि.वि.सिद्धार्थ मराठे 6-4; मिश्र दुहेरी: श्रावणी खवळे/पार्थ देवरुखकर पराभूत वि.ख़ुशी शर्मा/अर्जुन कीर्तने (3)5-6; मिश्र दुहेरी: स्नेहा रानडे/प्रसाद इंगळे पराभूत वि.रिया भोसले/रोहन फुले 3-6).
महत्त्वाच्या बातम्या:
-पाँटिंगच्या मते स्टीव्ह स्मिथ खेळत नसल्याने हा खेळाडू आहे सर्वोत्तम!
-मैदानात पाऊल ठेवताच किंग कोहलीच्या नावावर विराट विक्रम