क्रिकेटच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांकडे आलेला चेंडू काही जण पकडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही सहज झेल घेण्यात यशस्वी होतात, तर काहींना ते जमत नाही. पण तो चेंडू पकडायच्या नादात मात्र काही स्वत:वरच दुखापतीचे संकट ओढावून घेतात.
ईडन गार्डन्स, कोलकाता येथे इंडियन प्रीमियर लीग २०२२चा एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यातही अशीच एक घटना घडली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यादरम्यान दीपक हुड्डाने मारलेला चेंडू पकडण्याच्या नादात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. हा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या वेबसाईटवर टाकला आहे.
कर्णधार केएल राहुलला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हुड्डा मैदानात आला. त्याने आल्याबरोबरच फटकेबाजीला सुरूवात केली. या डावाच्या आठव्या षटकावेळी शाहबाज अहमद गोलंदाजीच्या पाचव्या चेंडूवर हुड्डाने षटकार खेचला. हा चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला असता जवळच उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आणि हातालाही दुखापत झाली.
Police man injured in ipl 2022 eliminator match#lsgvsrcbhttps://t.co/v9X2Ezh9PU
— Rahil sayed (@Rahilsa61575873) May 25, 2022
हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाणेफेक जिंकत राहुलने बेंगलोरला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याला शून्यावर बाद करत लखनऊच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली, तर विराट कोहली (Virat Kohli) याला पण लवकरच तंबूत पाठवले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने मात्र लखनऊच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने नेहमीसारखीच शानदार फलंदाजी करत २३ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारत ३७ धावा केल्या. यामुळे बेंगलोरने २०८ धावांचे लक्ष्य लखनऊपुढे ठेवले.
या लक्षाचा पाठलाग करताना लखनऊ संघानेही त्यांच्या दोन विकेट लवकर गमावल्या. नंतर राहुलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने ५८ चेंडूत ७९ धावा केल्या. वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होण्याआधी हुड्डाने २६ चेंडूत एक चौकार आणि चार षटकार खेचत ४५ धावा केल्या. जोश हेजलवूड आणि हर्षल पटेलच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे लखनऊने हा सामना १४ धावांनी गमावला.
आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊने साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले होते, पण बेंगलोरविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्याने ते स्पर्धेबाहेर पडले आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान
आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद