भारताविरुद्ध 4 ऑगस्टला झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात पंचांच्या आज्ञेचे पालन न केल्याने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डला आयसीसीने दंड केला आहे.
पोलार्डने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.4 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच्याच्या आज्ञेचे पालन न करण्याबद्दल आहे.
आयसीसीने या प्रकरणी पोलार्डला मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि 1 डीमिरिट पॉइंट दिला आहे.
पंचांनी राखीव खेळाडू मैदानावर बोलावण्याआधी विनंती केली पाहिजे असे पोलार्डला अनेकदा बजावूनही पोलार्डने राखीव क्षेत्ररक्षकाला मैदानात बोलावले होते. त्याला पुढील एक षटक संपेपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता. पण त्याने पंचाच्या निर्णयाचे पालन केले नाही.
पोलार्डने या आरोपांना मान्य केले नव्हते. पण नंतर आयसीसी मॅच रेफ्रींच्या एलिट पॅनेलमधील मॅच रेफरी जेफ क्रो यांच्यासमोर औपचारिक सुनावणी झाली. यामध्ये पोलार्डला दोषी असल्याचे आढळले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएमध्ये सर्वात पहिले शतक करणाऱ्या ब्रेंडन मॅक्यूलमची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
–पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय
–कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती