आजपासून (4 मार्च) पल्लेकल्ले (Pallekele) येथे वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात (Windies vs Sri Lanka) 2 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील (T20I) पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत विंडिज संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा सामना विंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डसाठी (Kieron Pollard) महत्त्वाचा ठरला आहे.
हा टी20 सामना खेळत पोलार्डने ट्वेंटी-20मधील 500 सामने खेळण्याचा अनोखा विश्वविक्रम केला आहे. ट्वेंटी-20 सामन्यात असा विक्रम करणारा तो जगातील आणि विंडिज संघातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
पोलार्डनंतर असा विक्रम करण्यासाठी विंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोला 46 सामन्यांची आवश्यकता आहे. हा त्याचा 454वा ट्वेंटी-20 सामना आहे. ब्रावोपाठोपाठ या यादीत विंडिजचा अष्टपैलू फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर, पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
जर या सामन्यात पोलार्डने 44 किंवा अधिक धावांचा आकडा पूर्ण केला असता,तर त्याला ट्वेंटी-20 सामन्यात दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम करता आला असता. मात्र या सामन्यात 5व्या क्रमांकावर फलंदाजी करत पोलार्ड 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 34 धावांवरच झेलबाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा फलंदाज लेंडल सिमन्सने 51 चेंडूत नाबाद सर्वाधिक 67 धावा केल्या. तर आंद्रे रसेल 35, ब्रेंडन किंगने 33 आणि निकोलस पूरनने 14 धावा केल्या आहेत. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
विंडीजने या सामन्यात निर्धारित 20 षटकात 4 बाद 196 धावा केल्या आहेत. तसेच श्रीलंकेला या सामन्यात 197 धावांचे आव्हान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित-कोहलीसह भारतीय क्रिकेटपटूंचे करियर आता या माजी खेळाडूच्या हाती
–गुजरातला पराभवाचा धक्का देत उनाडकटचा सौराष्ट संघ रणजीच्या फायनलमध्ये
–महिला टी२० विश्वचषक: पावसामुळे सेमीफायनलचे सामने रद्द झाले तर हे संघ जाणार फायनलमध्ये