पुणे । शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जेट्स संघाने पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत लायन्स संघावर तीन धावांनी मात केली. जेट सिंथेसायझर, मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जेट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ६ बाद ५९ धावा केल्या. यात सलामीवीर चिराग लुल्लाने १२ चेंडूंत २२, तर पुनीत सामंतने १२ चेंडूंत २९ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्स संघाला ३ बाद ५६ धावाच करता आल्या. लायन्सकडून किरण देशमुखची लढत एकाकी ठरली. त्याने १४ चेंडूंत २८ धावा केल्या.
इतर लढतींत सेलर्स संघाने मॅक्सिमम मॉव्हरिक्स संघावर ५ गडी राखून मात केली, तर टायगर्स संघाने वॉरियर्सवर २७ धावांनी सहज विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक – १) जेट्स – ६ षटकांत ६ बाद ५९ (पुनीत सामंत २९, चिराग लुल्ला २२, सुरज राठी २-३, किरण देशमुख २-६) वि. वि. लायन्स – ६ षटकांत ३ बाद ५६ (किरण देशमुख २८, मनोपाल सेहंबेय १५, रोझेबेह भारदा १-४, शरणसिंग १-८).
२) मॅक्सिमम मॉव्हरिक्स – ६ षटकांत ५ बाद ५४ (जयदीप पटवर्धन २९, अली हाजी १८, सुमिरन मेहता १-५, राजेश कासट १-५) पराभूत वि. सेलर्स – ५.३ षटकांत ३ बाद ५५ (सुमिरन मेहता नाबाद २९, मल्हार गाणला १५, सौरव घुले २-१५).
३) टायगर्स – ६ षटकांत १ बाद ९५ (रोहित जाधव नाबाद ७१, यश उगले १-८) वि. वि. वॉरियर्स – ६ षटकांत २ बाद ६८ (कुणाल अगरवाल नाबाद २६, विशाल सेठ नाबाद १८, राजदीप २-१२).
४) ऑल स्टार – ६ षटकांत ५ बाद ५० (पवित पथेजा १७, रोहित आचार्य १४, अरुण खट्टर २-५, रोनक मनुजा २-३) वि. वि. ईगल्स – ६ षटकांत ६ बाद ३९ (तारीक परवानी १९, अरुण खट्टर ११, ह्रतीक उत्तेकर ४-१).
५) व्हेव्ज – ६ षटकांत ३ बाद ४२ (अदिल खान १६, विमल हंसराज १-८, मेहुल ओसवाल १-८) पराभूत वि. टायफून्स – ५.१ षटकांत २ बाद ४६ (अश्विन शहा नाबाद १६, करण शर्मा नाबाद १३, सचिन मेलिंकेरी १-९).