पुणे। अखेरपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत वॉरियर्स संघाने जेट्स संघावर पाच धावांनी मात करून पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. वॉरियर्सने दिलेल्या ८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेट्स संघाला २ बाद ७४ धावाच करता आल्या.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष सुनील हांडा, स्पर्धा समितीचे अध्यक्ष शशांक हळबे, अमेय कुलकर्णी, मुख्य प्रायोजक राकेश नवाणी, शितल नवाणी, आशुतोष आगाशे, मनजीत राजपाल, तारीक पारवानी, उमेश पिल्लई,रणजित पांडे, अशोक गाडगीळ, अभिषेक बोके,भारत शाह, आदीत्य कानिटकर उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष होते. मॅन आॅफ दि सिरीजचा किताब आरव विज याने पटकाविला. चिराग लुल्ला सर्वोत्कृष्ट फलंदाज तर आर्यन गाडगीळ सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला.
वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ३ बाद ७९ धावा केल्या. यात सलामीवीर आर्यन गाडगीळला फटकेबाजी करण्यात अपयश आले. मात्र, दुसऱ्या बाजूने कर्णधार आरव विजने जबरदस्त सुरुवात केली. त्यामुळे ३.३ चेंडूतच धावांचे अर्धशतक फलकावर लागले होते. आरवने १५ चेंडूत पाच षटकार व एक चौकारसह ४१ धावा केल्या, तर आर्यन १० चेंडूत १० धावा काढून बाद झाला. झियान तलबने आठ चेंडूत दोन षटकारांसह नाबाद १७ धावा जोडून वॉरियर्स संघाला ७९ धावांपर्यंत पोहचविले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रिषभ बजाज पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर कर्णधार चिराग लुल्ला आणि पुनीत सामंत यांनी फटकेबाजी केली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपूर्ण ठरले. चिराग २३ चेंडूत सहा चौकारसह ४६ धावा काढून बाद झाला, तर पुनीतने अकरा चेंडूत नाबाद २१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
वॉरियर्स – ६ षटकांत ३ बाद ७९ (आरव विज ४१, झियान तलब नाबाद १७, आर्यन गाडगीळ १०, रिषभ बजाज २-८, शरण सिंग १- ११ ) वि. वि. जेट्स – ६ षटकांत २ बाद ७४(चिराग लुल्ला ४६, पुनीत सामंत नाबाद २१, झियान तलब १-१३, अखलाक पूनावाला १-१४).
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेट @१४५! इंग्लंडने खेळले हजारहून अधिक सामने, तर ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी
आयपीएल २०२२ मध्ये सामन्यात मिळणार चार डीआरएस, नवीन नियम जाहीर; वाचा सविस्तर