पुणे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभागीय समिती व नेस वाडिया कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे शहर आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत पूना कॉलेजने विद्याभवन महाविद्यालयास 11-10 ने नमवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या पारितोषिक प्रसंगी पुणे शहर समिती उपाध्यक्ष रवी पाखरे, डॉ.आयाज शेख, आयोजक सचिव मिथुन त्रिभवन, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, नेस वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, पुणे शहर विभागीय क्रीडा समिती सचिव मनीषा कोंढरे ,प्रा. आशद शेख, प्रा. इम्रान पठाण प्रशिक्षक सोहेल शेख उपस्थित होते. पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख उपप्राचार्य इक्बाल शेख, उपप्राचार्य खान मोहिनुद्दीन यांनी खेळाडू तसेच शारीरिक शिक्षक क्रीडा संचालक डॉ.अयाज शेख सर्वांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत उत्कृष्ट बचाव रक्षक सोहम कोरड , उत्कृष्ट गोलरक्षक शिवांश सिंग, उत्कृष्ट खेळाडू ओमकार नले, स्पर्धेचा टॉप स्कोरर प्रभुदा गायकवाड या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नौरोजी वाडिया कॉलेजने मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर यांचा 3 -0 ने पराभव केला. नौरोजी वाडिया कॉलेजच्या हर्ष उत्तेकर एक गोल व राजूराम याने दोन गोल मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला व तिसरे स्थान मिळवले.
अंतिम सामन्यात पूना कॉलेज व विद्याभवन महाविद्यालय यांचा सामना निर्धारित वेळेत एकही गोल न झाल्याने हा सामना पेनल्टी शूट मध्ये गेला. पूना कॉलेज आक्रमक पद्धतीने खेळ खेळत असताना विद्याभवन संघाने बचावात्मक खेळ करून सामना पेनल्टी शूटमध्ये पोहचवले.
पेनल्टी शूटमध्ये प्रथम विद्याभवनच्या असली विन्सेंट याने गोल नोंदविला त्यानंतर पूना कॉलेजच्या यश पवारने गोल नोंदवत बरोबर केली. परंतु विद्याभवनच्या ब्रायन अँथोनी याने फुटबॉल नेटच्या बाहेर मारून संधी गमावली नंतर पूना कॉलेजच्या प्रभुदा गायकवाड ,रोमारिओ नजरेत, मोनीश सिद्धा यांनी गोल केले. पूना कॉलेजच्या सय्यद मोहम्मद असद याचा गोल असली ऍंथोनीने वाचवत सामना बरोबरीत आणला.
सामना सडन डेथमध्ये गेला विद्या भवनच्या वतीने नितीन , प्रवीण झा ,श्रीनिवास अध्यनती , मॅथ्यू असिन ,असली अँथोनी यांनी गोल केले तर पूना कॉलेजच्या वतीने संदेश मोरे, यश झूनझूनवाला, ओमकार नले ,बेवन चौरअप्पा, प्रियतोष चतुर्वेदी, मोनीश शेख यांनी गोल केले व सामना बरोबरीत आणला. त्यानंतर विद्याभवन च्या अफरीद नेगल याने गोल बाहेर मारला व पूना कॉलेजच्या वतीने प्रभूदा गायकवाड याने विजयी गोल नोंदवून व पूना कॉलेज कॉलेजला विजयी मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –








