दोन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर लवकरच क्रिकेटविश्वाला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता मिळणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे साथउम्पटन येथे चालू असलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची सुरुवात होण्यास एका दिवसाचा विलंब झाला. अखेर शनिवारपासून (१९ जून) या सामन्याची सुरुवात झाली आहे. अंधुक प्रकाशामुळे या सामन्याचा शनिवारचा खेळ ६४.४ षटकांवर थांबवण्यात आला. यावेळी भारतीय संघाने ३ गडी गमावत १४६ धावा फलकावर नोंदवल्यावर आहेत.
या ऐतिहासिक सामन्याबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पुनम पांडे ही चर्चेत आली आहे. पुनम तिचा पती सॅम बॉम्बेसह स्पॉट बॉइजला रेशन किट वाटण्यासाठी गेली होती. यावेळी मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना तिने प्रतिक्रिया दिली आहे.
लॉकडाऊनदरम्यान गरजूंना करत असलेल्या मदतीविषयी चर्चा करताना एका पत्रकाराने पुनमला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ती चकित होऊन म्हणाली की, “क्रिकेट चालू आहे? लोक क्रिकेट खेळत आहेत? मग तुमची काय इच्छा आहे? मी परत स्ट्रिप (कपडे काढणे) व्हायचे भाष्य करावे?”
पुनमच्या या वक्तव्यावर तिचा पती सॅमनेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मग मी तिला स्ट्रिप करू शकतो.” यावर पुनम हसत म्हणाली की, “तू मला स्ट्रिप करू इच्छितो? नको करूस. भारत पराभूत होईल.”
पुनम सर्वप्रथम २०११ मध्ये चर्चेत आली होती. यावेळी तिने घोषणा केली होती की, जर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर ती न्यूड होईल. इतकेच नव्हे तर, तिने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) याप्रकरणी पत्रही लिहिले होते.
भारत-न्यूझीलंड कसोटी अजिंक्यपद सामन्याचा विचार करायचा झाल्यास, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारताकडून सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी ३४ आणि २८ धावांचे योगदान दिले. तर कसोटीपटू चेतेश्वर पुजारा अवघ्या ८ धावांवर बाद झाला. मात्र कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सावरला. विराट नाबाद ४४ धावा आणि अजिंक्य नाबाद २९ धावांसह मैदानावर उपस्थित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रॅप सॉन्गला ढोलचा तडाखा! भारतीय चाहत्यांनी विशेष पद्धतीने ‘किंग कोहली’ला केले चीयर
भारताच्या युवा रणरागिनीने रचला इतिहास, गोलंदाजी अन् फलंदाजीत कमाल करत नोंदवला ‘विश्वविक्रम’
‘विनोदी पंचगिरी’; किवींनी नकार देऊनही पंचांची थर्ड अंपायरकडे धाव, सेहवागने साधला निशाणा