वेस्टइंडीजचा शानदार फलंदाज निकोलस पुरणने काल 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (West Indies Cricketer Nicolas pooran retired from International cricket) त्यानंतर आता त्याला मुंबई इंडियन्स फ्रेंचाईजीने (Mumbai Indians Frenchie) मोठी जबाबदारी दिली आहे. आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांची सहावी ट्रॉफी जिंकता जिंकता राहिली. संघाला एलिमिनेटर सामन्यात पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आता फ्रेंचाईजीने दुसऱ्या लीगसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मेजर लीग क्रिकेटमध्ये मागच्या हंगामात मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचं कर्णधारपद कायरन पोलार्डकडे (Kairan Polard) होतं, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने ट्रॉफी देखील जिंकली होती, तसेच यावेळी नव्या हंगामासाठी पोलार्डच्या जागेवर निकोलस पुरणला नवीन कर्णधार करण्यात आले आहे.
निकोलस पुरणसाठी आयपीएल 2025 (IPL 2025) हंगाम खूप शानदार हंगाम राहिला आहे. लखनऊ संघाने या खेळाडूला 21 करोड रुपयांना रिटेन केले होते. त्यानंतर पुरणने हे सिद्ध केले की, लखनऊने त्याला एवढ्या मोठ्या किमतीला का खरेदी केले होते. आयपीएल 2025 मध्ये त्याने शानदार फलंदाजी करत 14 सामन्यांमध्ये 524 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 196.25 एवढा होता. ज्यामध्ये 5 अर्धशतक देखील सामील होते, याशिवाय पुरणने 18 व्या हंगामात 40 षटकार सुद्धा झळकावले होते, तो या हंगामात सर्वात जास्त षटकार झळकावणारा खेळाडू देखील ठरला आहे.
त्याच्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये पुरणने वेस्टइंडीजसाठी 61 वनडे आणि 106 टी20 सामने खेळले होते. वनडेमध्ये त्याच्या नावावर 1983 धावा होत्या, ज्यामध्ये पुरणने 3 शतक आणि 11 अर्धशतक झळकावले होते. याशिवाय टी 20 मध्ये निकोलस पुरणने 2275 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याच्या बॅटने 13 अर्धशतक आले होते.