वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 (WMPL) मध्ये आज पुणे वाॅरियर्स आणि रत्नागिरी जेट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात रत्नागिरी जेट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 112 धावा केल्या. रत्नागिरीकडून शिवाली शिंदेने शानदार अर्धशतक झळकावले. तिने 49 चेंडूत 58 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तिच्या जोडीने गौतमी नाईकने 19 चेंडूत 15 धावांची संयमी खेळी केली.
पुणे वाॅरियर्सकडून गोलंदाजीत चिन्मयी बोरफळे आणि ईशिता खाले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. चिन्मयीने 4 षटकांत केवळ 10 धावा देत 1 बळी घेतला, तर ईशिताने 4 षटकांत 13 धावा देत 1 बळी मिळवला.
या सामन्यात पुणे वाॅरियर्सला विजयासाठी 113 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे रत्नागिरी जेट्ससाठी हा सामना ‘करो किंवा मरा’सदृश असून बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. आता सर्वांच्या नजरा पुणे संघाच्या प्रत्युत्तरावर लागल्या आहेत.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेईंग ईलेव्हन
रत्नागिरी जेट्स प्लेईंग इलेव्हन:
स्मृती मंधाना (कर्णधार), गौतमी नाईक, शिवाली शिंदे, प्रियांका घोडके, ज्ञानेश्वरी पाटील, संजना वाघमोडे, भक्ती मिरजकर, अनुश्री स्वामी, रसिका शिंदे, ज्ञानदा निकम, श्रुती महाबळेश्वरकर
पुणे वॉरियर्स प्लेईंग इलेव्हन:
खुशी मुल्ला, सुहानी काहांडळ, अक्षया जाधव, अनुजा पाटील (कर्णधार), श्वेता माने, समृद्धी दाळे, श्रद्धा गिरमे, श्वेता सावंत, चिन्मयी बोरफळे, उत्कर्षा कदम, इशिता खाले






