पुणे । इंडियन सुपर लीगच्या इतिहासात सहा सामन्यांत दिल्ली डायनॅमोजला एकदाच हरविणे एफसी पुणे सिटीला शक्य झाले आहे. आता चौथ्या आयएसएलमध्ये हे दोन संघ श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्टेडियमवर बुधवारी आमनेसामने येतील. नवे मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविचयांच्या मार्गदर्शनाखाली पुणे संघाने दिल्लीच्या संघाला रोखण्याची आशा बाळगली आहे.
सर्बियाचे पोपोविच म्हणाले की,पहिल्या सामन्यासाठी मी आतूर झालो आहे.
आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. खेळाडू सुद्धा फार उत्साहात आहेत.
आम्ही अपेक्षित ध्येय साध्य करू शकू अशी आशा आहे.
पहिला सामना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल का,
या प्रश्नावर पोपोविच म्हणाले की, तसे वाटत नाही. तुम्हाला जिंकायचे असेल तर घरच्या तसेचप्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरही
चांगला खेळ करावा लागतो, पण घरी खेळताना तीन गुण जिंकण्यासाठी जास्त पाठिंबा मिळेल.
अर्थात त्यामुळे आमच्या खेळण्याच्यापद्धतीमध्ये बदल होणार नाही.
50 वर्षांचे पोपोविच भारतात प्रथमच आले आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांनी दर्जा सिद्ध केला आहे.
त्यांना स्थिरावण्यास फारसा वेळ लागत नाही. त्यांनी प्रशिक्षकम्हणून पदार्पणाच्या मोसमात
स्पेनमध्ये द्वितीय श्रेणी साखळीत रेयाल झारागोझाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून दिले.
गेल्या मोसमात त्यांनी थायलंडमधील संघाला प्रथमच मार्गदर्शन केले. बुरीराम युनायटेड
एफसीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली थाई करंडक यश संपादन करता आले.
आता ते एफसी पुणे सिटी संघावर पहिल्याच मोसमात असाच प्रभाव पाडतील अशी आशा पुणेकर फुटबॉलप्रेमींना आहे.
नव्या प्रशिक्षकांकडे बरेच भेदक खेळाडू आहेत. गेल्या मोसमात सर्वाधिक गोल केलेल्या मार्सेलिनो याने दिल्लीहून पुण्याला स्थलांतर केले आहे. किन लुईसही पुण्यात दाखल झाला आहे. या जोडीने मिळून गेल्या मोसमात 14 वेळा लक्ष्य साधले होते. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
दिल्लीला गेल्या मोसमातील सातत्य राखायचे आहे. तीन पैकी दोन मोसमांत त्यांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, पण त्यांना अद्याप अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे नवे स्पॅनीश प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांचे अंतिम फेरी हेच लक्ष्य असेल.
https://www.youtube.com/watch?v=zXWLq0h6EXM&t=68s
पोर्तुगाल म्हणाले की, चांगली सुरवात करणे महत्त्वाचे असेल. पहिल्या सामन्यात माझ्या संघाच्या क्षमतेची कसोटी लागेल. स्पर्धा फार संतुलित आहे. माझ्यादृष्टिने कोणताही संघ जिंकू शकतो.
दिल्लीला गेल्या मोसमातील काही चांगले खेळाडू गमवावे लागले, पण त्यांनी सक्षम पर्याय निर्माण केले आहेत. नायजेरियाचा स्ट्रायकर कालू उचे याच्यावर मदार असेल. याशिवाय नेदरलँड््सचा स्ट्रायकर गुयॉन फर्नांडेझ याला पाचारण करण्यात आले असून तो कालू याच्या जोडीला असेल.
पोर्तुगाल यांनी प्रतीस्पर्धी संघाविषयी सांगितले की, पुणे संघ चांगला आहे. मार्सेलिनो, अल्फारो असे काही चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. संघासाठी येऊन सामना खेळण्यासाठी पुणे हे अवघड ठिकाण आहे. आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू. माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे, पण आमचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे खेळ कसा होतो ते आम्ही पाहू. इतर संघ कसे खेळतात याचाही अंदाज आम्हाला घ्यावा लागेल.
https://www.youtube.com/watch?v=c4QJuhd4nOA&t=2s