मोस्कोे। फिफा विश्वचषक 2018 ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्यानेही आत्तापर्यंत आपल्या चाहत्यांना नाराज केलेले नाही.
आज, 20 जूनला पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को सामन्यात महत्त्वाचा एक गोल करत रोनाल्डोने पोर्तुगालला 1-0 ने विजय मिळवून दिला. या गोलबरोबरच त्याने मोठा विक्रमही रचला आहे.
रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 85 गोल पूर्ण केले आहेत. याबरोबरच तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा यूरोपियन खेळाडू ठरला आहे. यासाठी त्याने फेरेनक पुस्कस यांना मागे टाकले आहे. पुस्कस हे हंगेरीकडून 1945 ते 1956 च्या दरम्यान खेळले आहेत.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासात तो सर्वाधिक गोल करण्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अव्वल स्थानावर इराणचे अली डेई आहेत. त्यांनी इराणकडून 1993 ते 2006 दरम्यान खेळताना 109 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.
फिफा वि२०१८. पोर्तुगल विरुद्ध मोरोक्को सामना
आज रोनाल्डोने ४थ्या मिनिटाला गोल करून अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे@Cristiano फुटबॉलच्या इतिहासात एका यूरोपियन खेळाडूने सगळ्यात जास्त गोल (८५) करणारा खेळाडू ठरला#WorldCup @Maha_Sports @kridajagat @MarathiRT— Pranali Kharbikar | प्रणाली (@pranalibk28) June 20, 2018
या सामन्याआधी पोर्तुगालचा फिफा विश्वचषक 2018 मधील पहिला सामना स्पेन विरुद्ध झाला होता. या सामन्यात रोनाल्डोने गोलची हॅट्रीक केली होती. हा सामना 3-3 असा बरोबरीत राहीला.
ब गटातून खेळणाऱ्या पोर्तुगालचा पुढील सामना सोमवारी 25 जूनला इराण विरुद्ध होणार आहे.
यावर्षीचा विश्वचषक हा रोनाल्डोचा एकूण चौथा विश्वचषक आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीन विश्वचषकात त्याला तीनच गोल करता आलेले आहेत. तर यावर्षीच्या विश्वचषकात त्याने पहिल्या दोन सामन्यातच 4 गोल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या स्टार खेळाडूने मानले विराटचे आभार!
–फिफा विशवचषक 2018: सौदी अरेबिया संघ मोठ्या दुर्घटनेतून बचावला
–मेस्सीसाठी भारतीय चाहत्याची सायकलवरुन रशियावर स्वारी…!!!