कटक येथे आफ्रिकेला 101 धावांनी हरवल्यानंतर भारतीय संघ मुल्लांपूरमध्येही जबरदस्त कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मालिकेतील दुसरा सामना 11 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik pandya) उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता, तर गोलंदाजीतही सर्व गोलंदाज प्रभावी ठरले होते. मात्र, विजय मिळूनही, दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) काही बदल पाहायला मिळू शकतात.
मुल्लांपूरच्या खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना (Spinners) मदत मिळते. दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडिया अर्शदीप सिंगला (Arshdeep singh) बाहेर ठेवून कुलदीप यादव (Kuldeep yadav) सोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कुलदीपची कामगिरी एकदिवसीय (ODI) मालिकेत जबरदस्त राहिली होती.
टॉप ऑर्डरमधील फलंदाजांची कामगिरी पहिल्या सामन्यात निराशाजनक राहिली होती. त्यामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. संजूने गेल्या काही काळात टॉप ऑर्डर आणि मधली फळी (Middle Order) दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे.






