---Advertisement---

आरसीबीला टाॅप-2 मध्ये जायचंय तर हैदराबादला हरवावंच लागेल, पहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये आज (23 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. या हंगामातील हा 65वा सामना आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. म्हणूनच या सामन्याचा त्यांच्यासाठी फारसा अर्थ नाही. पण, हा सामना आरसीबीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आरसीबीला टॉप-2 मध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. (Possible playing 11s for RCB and SRH)

आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली चालू हंगामात उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात एकजुटीने कामगिरी केली आणि म्हणूनच विरोधी संघांसाठी बंगळुरूला हरवणे हे मोठे आव्हान होते. बंगळुरूने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. अशाप्रकारे, आरसीबी 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, हैदराबादने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांना फक्त 4 सामने जिंकता आले आहेत, तर 7 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

सामन्यापूर्वी आपण दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोललो तर, ही आरसीबीसाठी चांगली बातमी म्हणता येईल. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार या सामन्यात खेळू शकतो. याशिवाय टिम डेव्हिड, जेकब बेथेल आणि फिल साल्ट सारखे परदेशी खेळाडू देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसतील. सनरायझर्स हैदराबादचा विचार केला तर, ट्रॅव्हिस हेड या सामन्याचा भाग नसेल. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अथर्व तायडे आणि अभिषेक शर्मा सलामीला येऊ शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फिल साल्ट, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम, यश दयाल आणि सुयश शर्मा

सनरायझर्स हैदराबाद – अथर्व तायडे, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, हर्ष दुबे, जीशान अन्सारी, इशान मलिंगा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---