भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना टाय झाला. यामध्ये भारतीय संघ खास कामगिरी करु शकला नाही. भारतानं हातातला सामना गमावला. फलंदाजी करताना भारतीय संघ श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर धडपडताना दिसला. या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 231 धावांचं लक्ष्य भारतीय फलंदाजांना गाठता आलं नाही. भारतीय संघ 230 धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना टाय झाला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना रविवारी (4 ऑगस्ट) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबो मैदानावर रंगणार आहे. पहिल्या सामन्यातून धडा घेत भारतीय संघ काही बदलांसह दुसऱ्या सामन्यात प्रवेश करु शकतो. अशा परिस्थितीत, या बातमीद्वारे आपण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल आणि हा सामना फ्रीमध्ये कुठे पाहायचा हे पाहूया.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, रियान पराग, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
जर चाहत्यांना एकदिवसीय मालिका विनामूल्य पाहायची असेल तर त्यांच्याकडे जिओ नंबर असणं आवश्यक आहे. जिओ वापरकर्ते सहजपणे सामना विनामूल्य सामना पाहू शकतात. यासाठी त्यांना ॲप स्टोअरवरून जिओ टीव्ही ॲप डाउनलोड करावा लागेल. त्यांना जिओ टीव्ही डाउनलोड करुन त्यावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण होताच, टीव्ही चॅनेलची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. या यादीमध्ये तुम्हाला सोनी नेटवर्कच्या त्या चॅनेलवर जावे लागेल ज्यावर सामना थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ बॅटनं आग ओकतोय, पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा; गौतम गंभीरच्या संघात संधी मिळेल का?
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला मग सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या आयसीसी नियम
आयपीएलमध्ये होणार मोठा बदल! हैदाराबादची मालकीण ॲक्शनमोड मध्ये, बीसीसीआयकडे मोठी मागणी