यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची क्रिकेट चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. हा आयपीएल हंगाम (21 मार्च) पासून सुरू होणार आहे. यावेळी सर्व संघ एका नवीन रूपात दिसतील. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीएल 2025साठी एक मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व संघांनी आपल्या बजेटनुसार खेळाडू खरेदी करून त्यांना संघात समाविष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत, यावेळी असे अनेक खेळाडू असतील जे त्यांच्या जुन्या फ्रँचायझीविरूद्ध खेळताना दिसतील. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयपीएलच्या सर्व 10 संघांमधील त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे आयपीएल 2025 मध्ये आपल्या संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना दिसतील.
लखनऊ सुपर जायंट्स- आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडे (LSG) 3 यष्टीरक्षक पर्याय असतील. पण फ्रँचायझी रिषभ पंतला (Rishabh Pant) ही भूमिका बजावण्यास सांगेल. पंतला यष्टीरक्षकाचा खूप अनुभव आहे.
मुंबई इंडियन्स- दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी रायन रिकेलटन आता आयपीएलच्या 18व्या हंगामात मुंबईसाठी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
गुजरात टायटन्स- गुजरात टायटन्सने (GT) मेगा लिलावात जोस बटलरला (Jos Buttler) खरेदी करून आपल्या संघात सामील केले. त्यामुळे तो गुजरातसाठी आयपीएलच्या 18व्या हंगामात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिल साल्ट (Phil Salt) आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
पंजाब किंग्ज- पंजाब किंग्ज (Punjab Kings) आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या मेगा लीगचा भाग आहे, परंतु अद्याप त्यांना ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही. आयपीएल 2025 साठी संघात 3 यष्टिरक्षकांचा समावेश आहे. यामध्ये प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद आणि जोश इंग्लिस यांची नावे आहेत. प्रभसिमरन सिंग यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबाद- आयपीएल 2024च्या उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडून हेनरिक क्लासेन यष्टीमागे दिसण्याची शक्यता आहे. मेगा लिलावापूर्वी हैदराबादने त्याला 23 कोटी रुपयांना रिटेन केले होते.
कोलकाता नाईट रायडर्स- कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) क्विंटन डी कॉक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्ज- चेन्नई सुपर किंग्जकडे (CSK) एमएस धोनीच्या रूपात जगातील सर्वात अनुभवी यष्टीरक्षक आहे. आयपीएल 2025 मध्ये धोनी पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल.
दिल्ली कॅपिटल्स- दिल्ली कॅपिटल्सचा (DC) प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आता फ्रँचायझीपासून वेगळा झाला आहे. पण दिल्लीने मेगा लिलावादरम्यान केएल राहुलला (KL Rahul) खरेदी करण्यात यश मिळवले. राहुल आता आयपीएल 2025 मध्ये दिल्लीसाठी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
राजस्थान रॉयल्स- राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हा एक अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आहे. अशा परिस्थितीत, यंदाच्या हंगामात तो आपल्या संघासाठी यष्टीची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; अर्शदीप सिंग ठोकणार शतक, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला सल्ला! म्हणाला, “पाकिस्तानने फक्त…”
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल इरफान पठाणची प्रतिक्रिया! म्हणाला, “संघ व्यवस्थापन…”