आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह केकेआरनं आपलं तिसरं आयपीएल विजेतेपद पटकावलं.
आयपीएलच्या या अंतिम सामन्याची चर्चा जगभरात झाली. सामन्यापूर्वी प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ‘ड्रेक’ यानं कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर मोठा सट्टा लावला होता. त्यानं शाहरुख खानच्या केकेआरवर तब्बल 2 लाख 50 अमेरिकन डॉलर्सचा सट्टा लावला होता. सट्टा लावल्यानंतर ड्रेकनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत याचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता.
या सामन्यापूर्वी एका मॉडेलनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. या मॉडेलनं म्हटलं होतं की, जर केकेआरचा संघ सामना जिंकला, तर ती तिचा ‘ब्रा’ न घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल. या मॉडेलचे ‘X’ वर 35 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
फायनलमध्ये केकेआरचा संघ विजयी ठरला, ज्यानंतर या मॉडेलनं दिलेला शब्द पाळला. तिनं ‘X’ वर तिचा ‘ब्रा’ न घातलेला फोटो पोस्ट केला, जो तुफान व्हायरल झाला आहे. तुम्ही हा फोटो येथे पाहू शकता.
As i promised, Dropping a without bra media.!! 😜 pic.twitter.com/cN8U6r4RnP
— ᴠɪsʜʀᴜᴛɪ ☆ (@Vishruti0) May 27, 2024
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात केकेआरनं हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची टीम 18.3 षटकांत अवघ्या 113 धावांवर ऑलआऊट झाली होती. केकेआरनं 114 धावांचं छोटेखानी लक्ष्य 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तर रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी 1-1 बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 पूर्वी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते सनरायझर्स हैदराबाद, लिस्टमध्ये दोन युवा भारतीय खेळाडूंचाही समावेश
सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं…पण फायनलमध्ये मात्र सर्वात कमी स्कोर! आयपीएलच्या रेकॉर्डब्रेक सीझनमध्ये बनले अनेक विक्रम
शाहरुख खाननं केलं बीसीसीआयला ट्रोल, ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दिलं ‘फ्लाइंग किस’; पाहा VIDEO