भारतात खेळली जाणारी आयपीएल लीग जगभरातील सर्वच खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ बनली आहे. तसेच बरेचशे देशी-विदेशी खेळाडू या आयपीएलच्या माध्यमातून त्यांच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यातही यशस्वी ठरले आहेत. तर काही खेळाडूंना रात्रीत कोट्याधीश होण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यामध्ये 20 वर्षीय प्रभसीमरण सिंगचाही समावाश आहे. त्याला पंजाब किंग्ज संघाने 2019 च्या आयपीएल लिलावामध्ये त्याला 4.8 कोटीं रूपयांत विकत घेतले होते. परंतु, या आयपीएल सत्रात त्याला फक्त एकाच सामन्यातील अव्वल अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 16 धावा केल्या होत्या.
त्यानंतर त्याला आयपीएल 2020 च्या लिलावापूर्वी संघातून मुक्त करण्यात आले होते. परंतु, आयपीएल 2020 च्या लिलावात पुन्हा एकदा पंजाब किंग्ज संघाने 55 लाख रूपयांत विकत घेतले. यंदाही तो आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून 55 लाख रुपये किंमतीत खेळणार आहे. या खेळाडूने आतापर्यंत आयपीएलमधून एकूण 5 कोटी 90 लाख रूपयांची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने अशी काही खास कामगिरी केलेली नाही. परंतु त्याला जास्त संधी मिळाली नाही हे सुद्धा खरे आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने पंजाब किंग्जकडून एकूण 3 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10.33 च्या सरासरीने एकूण 31 धावा केल्या आहेत. मागील दोन सत्रातील अपयश विसरून त्याला आयपीएल 2021 मध्ये पंजाब संघाकडून चांगली कामगिरी कराण्याची अपेक्षा असेल.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये या 20 वर्षीय खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या अ दर्जाच्या 12 सामन्यांत 32.27 च्या सरासरीने एकूण 355 धावा केल्या आहेत. तर त्याने 23 टी20 सामन्यात 33.50 च्या सरासरीने एकूण 603 धावा केल्या आहेत. या धावा करतानाचा त्याचा स्ट्राइक रेट 139.58 इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात हैं! दिनेश कार्तिकचा दिसला आक्रमक अंदाज, चौकार-षटकारांची केली बरसात, पाहा व्हिडिओ






