यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 44वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ ईडन गार्डन्सच्या मैदानावर आमने-सामने आहेत. दरम्यान पंजाब किंग्सने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यांनी 4 गडी गमावून 201 धावा केल्या. केकेआरसमोर आता विजयासाठी 202 धावांचं आव्हान आहे.
पंजाबसाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामी दिली. दोन्ही फलंदाजांनी संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकारांसह 6 षटकार ठोकले. तर प्रियांश आर्यने 69 धावा केल्या. त्याने 4 षटकारांसह 8 चौकार लगावले. सुरूवातीपासूनच दोन्ही फलंदाजांनी आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 25 धावांची खेळी केली. यांच्या जोरावर पंजाबचा संघ 201 धावा करण्यात यशस्वी ठरला.
केकेआरसाठी वेगवान गोलंदाज वैभव अरोराने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली. तसेच आंद्रे रसेल 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. आता कोलकाताचा संघ 202 धावा करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Stylish and Audacious 😎
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
A brilliant 120-run opening partnership comes to an end 👏#PBKS 121/1 after 12 overs.
Updates ▶ https://t.co/oVAArAaDRX #TATAIPL | #KKRvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/o6U9uzFrNJ
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियंश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोव्हमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन सकारिया, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती