जकार्ता येथे होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हे सराव शिबीर १५ मार्च २०१८ ते १४ एप्रिल २०१८ या काळात होणार आहे.
पुरूष खेळांडूंचे सराव शिबीर सोनीपत, हरियाणा येथे तर महिला खेळाडूंचे सराव शिबीर गांधीनगर, गुजरात येथे होणार आहे.
६५व्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष संघातील कर्णधार रिशांक देवाडीगा (मुंबई उपनगर), गिरीश इर्नाक(ठाणे), निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली) आणि विकास काळे (पुणे) या पुरुष खेळाडूंचा यात समावेश आहे.
तर महिला खेळांडूमध्ये गोरगन, इराण येथे भारतीय संघाच २०१७ मध्ये नेतृत्व केलेली अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर), महाराष्ट्राच्या संघाच राष्ट्रीय तसेच फेडरेशन कपमध्ये नेतृत्व केलेली सायली जाधव (मुंबई उपनगर) आणि सायली केरीपाळे (पुणे ) यांचा समावेश आहे.
१८वी आशियाई स्पर्धा १८ आॅगस्ट २०१८ ते २ सप्टेंबर २०१८ रोजी इंडोनेशियातील जकार्ता येथे होणार आहे.