वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. दीपक हुड्डालाही दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवडले गेले आहे. हुड्डाने भारतीय संघासाठी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाने वेस्ट इंडीज दौऱ्यातही हुड्डाकडून अशाच चांगल्या प्रदर्शानाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक करणारा चौथा कर्णधार बनला होता. दीपक हुड्डाने याच वर्षी मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतून एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने या मालिकेत ५५ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर टी-२० संघासाठी त्याने अप्रतिम प्रदर्शन केले आणि टी-२० संघात पुन्हा एकदा स्थान बनवले.
प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) एका वृत्तसंस्थेशी बोलत होता. हुड्डाने भारतीय संघासाठी केलेल्या चांगल्या प्रदर्शनाविषयी बोलताना ओझा म्हणाला की, “मला दीपक हुड्डाला अजून खेळताना पाहायचे आहे, कारण त्याने खूप सारे वचन दिले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने अनेक बाधा पार करून भारतीय संघात जागा बनवली आहे. तो कसे प्रदर्शन करतो, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
ओझाला या दौऱ्यात सूर्यकुमार यादवकडूनही खूप अपेक्षा आहेत. तो म्हणाला की, “सूर्यकुमार यादव थोडा सिनियर आहे, पण अजूनही संघात स्वतःचे स्थान बनवत आहे. हे दोघे मालिकेत कसे प्रदर्शन करतात, हे मला पाहायचे आहे.”