पुणे। एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल, ससी कुमार मुकुंद, रामकुमार रामनाथन या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंसाठी आजचा दिवस संमिश्र ठरला. भारताच्या दहाव्या मानांकित साकेत मायनेनी याला तुर्कीच्या बिगर मानांकित एर्गी किर्रकीन यांच्याकडून ३-६,७-५,६-४ असा पराभव पत्करावा लागला.
भारताच्या अव्व्ल मानांकित प्रज्ञेश गुणेश्वरनने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत चंद्रील सुदचा केवळ ४९ मिनिटात ६-१,६-३ अशा फरकाने सहज पराभव केला. भारताच्या तिसऱ्या मानांकित सुमित नागलने १ तास १६ मिनिटाच्या सामन्यात ६-३,७-६(५) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. भारताच्या सहाव्या मानांकित रामकुमार रामनाथन याने ग्रीसच्या मार्कोस कालोवेलोनीसचा ६-३,६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या आठव्या मानांकित ससी कुमार मुकुंदने जपानच्या तोशिहीदे मत्सुई याचा ६-२,६-३ असा पराभव केला.
दुहेरी गटात भारताच्या एन.विजय सुंदर प्रशांतने इंग्लंडच्या ब्रेडन क्लेन या चौथ्या मानांकित जोडीने भारताच्या धृव सुनिश व आर्यन गोवीस यांचा ६-२,६-१ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
ऐकेरी गट- दुसरी फेरी
प्रज्ञेश गुणेश्वरन (१)(भारत) वि वि चंद्रील सुद(भारत) ६-१,६-३
सुमित नागल(३)(भारत) वि वि आर्यन गोवीस(भारत) ६-३,७-६(५)
ससी कुमार मुकुंद(८)(भारत) वि.वि तोशिहीदे मत्सुई(जपान)६-२,६-३
रामकुमार रामनाथन(६)(भारत) वि.वि मार्कोस कालोवेलोनीस(ग्रीस)६-३,६-४
केम ईलकेल(१२)( तुर्की ) वि वि विनायक शर्मा काझा(भारत) ६-२,६-१
ब्रेडन क्लेन(१५)(इंग्लंड) वि वि सिध्दार्थ रावत(भारत) ६-१,३-६,६-४
एर्गी किर्रकीन(तुर्की) वि वि साकेत मायनेनी(१०)(भारत) ३-६,७-५,६-४
रोबेर्टो ओल्मेडो(७)(स्पेन) वि वि अनिरूध्द चंद्रसेखर(भारत) ६-३,६-२
ब्रेडन क्लेन(इंग्लंड)(१५) वि वि सिध्दार्थ रावत(भारत) ६-१,३-६,६-४
ली डक-ही(९)(दक्षिण कोरीया) वि वि अझिझ डोगाझ(ट्युनीशिया) ६-३,६-४
स्टिव्ह डिझ(४)(कॅनडा) वि वि युसुके ताकाहाशी(जपान) ६-२,६-२
ईवान नेदेल्को(१३)(रशिया) वि वि धृव सुनिश(भारत) ६-३,५-७,६-२
दुहेरी गट- पहिली फरी
बोगदान बोब्रो(रशिया)/इवान नाइडल्को(रशिया) वि वि तिमुर खाबीबुलीन(कझाकिस्तान)/मार्कोस कलोवेलोनिस(ग्रीस)६-४,६-७,१०-३
अझिझ डोगाझ(ट्युनीशिया)/केल्विन हेमरी(फ्रांस) वि.वि धृव मुळे(अमेरीका)/डेव्हिड सरेरो(स्पेन)६-२,७-५
रोबेर्टो ओल्मेडो(स्पेन)/स्टिव्ह डिझ(कॅनडा) वि.वि केम ईलकेल( तुर्की )/एर्गी किर्रकीन(तुर्की) ६-२,६-२
एन.विजय सुंदर प्रशांत(भारत)/ब्रेडन क्लेन(इंग्लंड)(४) वि.वि धृव सुनिश(भारत)/आर्यन गोवीस(भारत) ६-२,६-१