---Advertisement---

बालुफ ऑटोमेशन ‘प्लेअर्स कप 2026’ पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत प्रणव घोलकर, स्वरदा साने यांना विजेतेपद

On: बुधवार, ऑगस्ट 5, 2026 10:38 PM
---Advertisement---

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटने तर्फे आयोजित व माजी टेबल टेनिसपटू यांच्या वतीने पुरस्कृत बालुफ ऑटोमेशन ‘प्लेअर्स कप 2026 पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव घोलकर याने, तर मुलींच्या गटात स्वरदा साने हिने विजेतेपद संपादन केले.

‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित प्रणव घोलकर याने निशाद लेलेचा 11-9,11-9,9-11,11-7,11-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रणव हा एमआयटी डब्लूपीयु कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षाला शिकत असून पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

19 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत जळगावच्या तिसऱ्या मानांकित स्वरदा साने हिने नीरजा देशमुखचा 11-2,11-5,11-8,11-8 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्वरदा हि छत्रपती राजे संभाजी महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

40 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सुयोग पाटीलने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत संजय पटेलवर 11-7,11-4,11-6 असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित स्वानंद बेडेकरने ओंकार जोगचा 11-6,9-11,12-10,11-6 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

निकाल : 19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
निशाद लेले वि.वि.कौस्तुभ गिरगावकर[5] 11-8,11-7,7-11,11-7
प्रणव घोलकर[3] वि.वि.स्वरूप भादलकर[7] 7-11,11-4,2-11,11-7,11-7
अंतिम फेरी: प्रणव घोलकर[3] वि.वि. निशाद लेले 11-9,11-9,9-11,11-7,11-3

19 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
नीरजा देशमुख वि.वि.निधी भांडारकर 11-6,13-15,11-6,3-11,11-3
स्वरदा साने[3] वि.वि.सई कुलकर्णी 8-11,11-2,11-13,11-9,11-8
अंतिम फेरी: स्वरदा साने[3] वि.वि. नीरजा देशमुख 11-2,11-5,11-8,11-8

40 वर्षांवरील पुरुष: उप-उपांत्यपूर्व फेरी:
सुयोग पाटील[1] वि.वि.अनिल निंबाळकर 12-10,11-7,11-4
ओंकार जोग वि.वि.विकास छेत्री 11-3,11-6,11-2
स्वानंद बेडेकर[4]वि.वि.विनोद शिंदे 11-7,11-8,11-5;
उपांत्यपूर्व फेरी:
सुयोग पाटील[1]वि.वि.संजय पटेल 11-7,11-4,11-6;
स्वानंद बेडेकर[4]वि.वि.ओंकार जोग 11-6,9-11,12-10,11-6.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---