2 जुलै 2022 मनामा बहरीन या ठिकाणी सुरू असलेल्या 15 वर्षाखालील मुलांच्या आशियाई ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची छान,कोकणचा रत्न,ठाणे जिल्ह्याचा कोहिनूर हिरा,सरवली गावचे सुपुत्र,रुस्तम ए हिंद पै अमोल बुचडे कुस्ती अकादमीच्या पै प्रणय राजू चौधरी यांनी 52 किलो ग्रीको रोमन विभाग मध्ये रौप्य पदकाची कमाई केली.
प्रणयची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून यामध्ये त्याने रौप्य पदका पर्यंत मजल मारली आहे.
प्रथम फेरीमध्ये इराणच्या मल्लाचा 2 विरुध्द 0 अशा गुण फरकाने पराभव केला.
दुसऱ्या फेरीमध्ये ताजिकिस्तानच्या मल्लाचा 10 विरुध्द 2 अशा प्रकारे एकतर्फी पराभव केला.
तिसऱ्या फेरीमध्ये किरगिझस्थानच्या मल्लाचा 7 विरुध्द 6 गुणांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
उपांत्य पूर्व फेरीमध्ये इराकच्या मल्लावर 6 विरूध्द 1 अश्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.
अंतिम फेरी कझाकस्तानच्या मल्ला बरोबर झाली यामध्ये प्रणयचा निसटता पराभव झाला.
पै.प्रणय राजू चौधरी याने आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकून ऐतिहासिक नोंद केली.
माझा पुतण्या पै.प्रणय चौधरी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत मजल मारणार याची आम्हाला खात्री आहे-डॉ.विनोद पाटील कोनकर
प्रणय कडून यापुढे यापेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा असल्याचे मत अमोल बुचडे यांनी व्यक्त केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फन फिटनेस आणि पुणेरी वॉरियर्सचा महिला लीगमध्ये सहज विजय
सिराजच्या झटक्याने इंग्लंडची धुळधान, भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी रचलाय इतिहास, कसोटी मालिकेत पहिल्यांदाच घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स