इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावात भारताचा अनकॅप्ड खेळाडू प्रशांत सोळंकी हा कोट्यधीश बनला आहे.
प्रशांतवर एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची नजर होती. चेन्नईबरोबरच राजस्थान रॉयल्सनेही या मुंबईकर खेळाडूमध्ये रस दाखवला. दोन्ही संघांमध्ये त्याला विकत घेण्यासाठी बरीच चुरस चालली. अखेर चेन्नई सुपर किंग्जने १ कोटी २० लाख रुपये देत त्याला विकत घेतले आहे.
Prashant Solanki is SOLD to @ChennaiIPL for INR 1.20 crore 👏👏#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
चेन्नई सुपर किंग्जने मेगा लिलावात विकत घेतलेला प्रशांत दुसरा मुंबईचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी त्यांनी तुषार देशपांडेला विकत घेतले आहे. तसेच महाराष्ट्रातून ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर आणि मुकेश चौधरी यांनाही चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे.
प्रशांतने आतापर्यंत देशांतर्गत स्तरावर ९ अ दर्जाचे सामने आणि १ टी२० सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ
पंड्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने खेळला ‘या’ खेळाडूवर ८ कोटीचा दाव