---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो

On: शुक्रवार, मे 7, 2021 8:04 AM
---Advertisement---

कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर लागले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ जून महिन्यात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. साउथम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध हा सामना होणार आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडने फार पुर्वीच संघ जाहीर केला होता. परंतु भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय जंबो स्क्वॅडची निवड करण्याची दाट शक्यता आहे. अशात संघात एका नवख्या शिलेदाराला संधी दिली जाऊ शकते. हा शिलेदार वेगवान गोलंदाज ‘प्रसिद्ध कृष्णा’ होय.

बीसीसीआयने जंबो स्क्वॅडची निवड करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, इंग्लंडलमध्ये त्यांना सराव सामने खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे. अशात भारतीय संघ आपाससात संघ बनवून सराव सामना खेळू शकतो. या संघात कमीत कमी ४ सलामीवीर, ४ मधल्या फळीतील फलंदाज, २-३ यष्टीरक्षक, ८-९ वेगवान गोलंदाज आणि ५ फिरकीपटूंना निवडले जाऊ शकते. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर सहभागी खेळाडू लवकरच इंग्लंडला रवाना होतील. जेणेकरुन त्यांना तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येईल.

येत्या २ दिवसांत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाऊ शकते. चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या संघाची निवड करु शकते. अशात मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रसिद्धला या संघात निवडले जाऊ शकते. त्याने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत ३ सामने खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या ५४ धावांवर ४ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.

याबरोबरच त्याला देशांतर्गत स्तरावर थोडाफार कसोटी स्वरुपातील सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९ सामने खेळताना ३४ विकेट्सची कामगिरी केली आहे.

असा असू शकतो भारतीय संघ-
केएल राहुल, मयंक अगरवाल, शुबमन गिल/पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा, केएस भरत, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

महत्त्वाच्या बातम्या-

खेळाडूंची जर्सी आयपीएल संघ मालकांसाठी असतो खजिना; करतात ‘एवढी’ कमाई

आयपीएल अर्ध्यात सोडून आपल्या घरी परतताना भावूक झाली युजवेंद्र चहलची पत्नी; ‘या’ खेळाडूंसह केला फोटो शेअर

कोरोना काळात सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आला सोनू सूद; केली ‘ही’ मोठी मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---