क्रिकेटमध्ये खेळाडू एका सामन्यातून हिरो तर कधी झिरो बनतात. असेच काहीसे राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्यासोबत झाले आहे. पहिल्या क्लालिफायर सामन्यात खलनायक ठरलेला प्रसिद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संघाच्या विजयाचा नायक ठरला. प्रसिद्धने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दुसऱ्या क्लाविफायर सामन्यात महत्त्वाच्या अशा ३ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ८ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा करता आल्या. यादरम्यान प्रसिद्धने (Prasidh Krishna) आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. बेंगलोरचा सलामीवीर विराट कोहलीला (Virat Kohli) प्रसिद्धने आपली पहिली शिकार बनवले. संजू सॅमसनच्या हातून कोहलीला त्याने ७ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर बेंगलोरचा धाकड फलंदाज दिनेश कार्तिकला त्याने स्वस्तात तंबूत धाडले. ६ धावांवर खेळत असलेल्या कार्तिकला प्रसिद्धने रियान परागच्या हातून झेलबाद केले.
त्यानंतर वानिंदू हसरंगाला पहिल्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळाचीत करण्याची करामत त्याने केली. अशाप्रकारे प्रसिद्धने बेंगलोर संघाच्या ३ मोठ्या विकेट्स घेत संघाच्या विजयात हातभार लावला.
पहिल्या क्वालिफायर सामन्यात ठरला होता खलनायक
तत्पूर्वी गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर (Qualifier 1) सामन्यात मात्र प्रसिद्धने भरपूर मार खाल्ला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने १८८ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना गुजरातला विसाव्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होता. राजस्थानकडून हे महत्त्वपूर्ण षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध आला होता आणि स्ट्राईकवर डेविड मिलर (David Miller) होता.
प्रसिद्धच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर मिलरने लॉंग ऑनला खणखणीत षटकार खेचला होता. आता गुजरातला विजयासाठी ५ चेंडूत १० धावा करायच्या होत्या. अशात सर्वांना वाटत होते की, जय-पराजय शेवटच्या चेंडूवर ठरेल. परंतु मिलरने पुढील सलग २ चेंडूंवर सलग २ षटकार मारले आणि सामन्यात गुजरात संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. या सामना विजयासह गुजरात संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग’, डू प्लेसिसच्या शब्दांनी जिंकली कोट्यावधी भारतीयांची मनं
उमरान मलिकबद्दल मेगा लिलावापूर्वी बंद खोलीत झाले होते बोलणे, प्रशिक्षक स्टेनचा गौप्यस्फोट
‘नशीबवान आहोत, की आमच्याकडे तो आहे’, सॅमसनने गायले ‘या’ खेळाडूचे गुणगान