भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Bengaluru test) सुरू आहे. या सामन्याच्या दुसरा दिवसाचा खेळ सुरू असून भारतीय संघ १५० पेक्षा जास्त धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि सलामीवीर मयंक अगरवाल फलंदाजी करत आहेत. यादरम्यान मैदानावर मोठी घटना घडला असून यामध्ये श्रीलंकेचा २३ वर्षीय डावखुरा गोलंदाज प्रविण जयविक्रमा (Praveen Jayawickrama) गंभीर जखमी झाला (Praveen Jayawickrama Injured) आहे.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील सातवे षटक सुरू असताना हा प्रसंग घडला आहे. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल हे षटक टाकण्यासाठी आला होता आणि भारताकडून रोहित व मयंक फलंदाजी करत होते. या षटकातील लकमलच्या पाचव्या चेंडूवर रोहितने पुढे सरकत कव्हरच्या दिशेने जोराने फटका मारला. परंतु रोहितच्या शॉटचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या श्रीलंकेचा गोलंदाज प्रविण जयविक्रमा याच्या उजव्या गुडघ्यावर जोराने आदळला.
तो चेंडू जयविक्रमाच्या गुडघ्याला इतक्या जोराने लागला होता की, तो काही वेळ मैदानावर वेदनेने व्हिवळताना दिसला. पुढे श्रीलंका संघाचे फिजिओ त्याच्या मदतीसाठी मैदानावर धावले आणि त्यांनी त्याची तापसणी केली. परंतु त्याला गुडघा गंभीररित्या जखमी झाल्यामुळे शेवटी त्याने मैदान सोडले.
Uh oh…This is not looking good for Sri Lanka
Praveen Jayawickrama is hobbling off.
LIVE COMMS:
👉 https://t.co/YV0ANllXfs 👈#INDvsSL | #INDvSL pic.twitter.com/ZMg3X8tkbl— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) March 13, 2022
Pravin Jayawickrama leaves the field with an injury. SL now a spinner short.#SLvsIND pic.twitter.com/iXBguqX3Yh
— wajith.sm (@sm_wajith) March 13, 2022
Pravin Jayawickrama leaves the field with an injury. SL now a spinner short. As if they didn't have enough headaches.#INDvsSL #jayawickrama #BCCI#teamindia #chinnaswamystadium #testmatch #CricketTwitter
— rahul (@drumm_drew) March 13, 2022
श्रीलंकेच्या संघाची वाढू शकते डोकेदुखी
पाहुण्या श्रीलंका संघासाठी हा फार मोठा धक्का होता. कारण यापूर्वी मोहाली येथील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांच्या गोलंदाज लहिरू कुमाराला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर झालेला आहे. अशात जर श्रीलंकेचा अजून एक गोलंदाज जखमी झाला, तर त्यांच्यासाठी गोष्टी अवघड होतील.
जयविक्रमा राहिलाय पहिल्या डावातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
विशेष म्हणजे, जयविक्रमाने बंगळुरू कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या डावात १७.१ षटके गोलंदाजी करताना ८१ धावा देत भारताच्या ३ फलंदाजांना बाद केले होते. त्याच्या या विकेट्समध्ये हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांच्या विकेट्सचा समावेश होता. त्यातही श्रेयसची विकेट त्याच्यासाठी आणि संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली होती. कारण श्रेयस ९२ धावांवर खेळत असताना जयविक्रमाने त्याला यष्टीरक्षक डिकवेलाच्या हातून यष्टीचीत केले होते. त्यामुळे श्रीलंका संघाला श्रेयसच्या रूपात मोठी विकेट मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ताक धिना धिन! डी सिल्वाची विकेट घेतलेल्या शमीच्या डोक्याला अश्विनने बनवले तबला, पाहा व्हिडिओ
न्यूझीलंडला १४१ धावांनी नमवत ऑस्ट्रेलियाची विजयाची ‘हॅट्रिक’, गुणतालिकेतही अव्वलस्थानी कब्जा