भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्या गाडीचा भिषण अपघात झाला. प्रवीण आणि त्याचा मुलगा यावेळी गाडीत होता आणि अपघातात त्यांना गंभीर दुखापत किंवा प्राण जाण्याची पूर्ण शक्यता होती. सुदैवाने भारतीय क्रिकेटपटूची गाडी मोठी असल्यामुळे त्याच्या शरीराला कुठलेच नुकसान झाले नाही. आता या अपघाताविषयी स्वतः प्रवीण कुमारनेच माहिती दिली आहे.
मंगळवारी (5 जुलै) रात्री उशिरा प्रवीण कुमार (Praveen Kumar) याच्या गाडीचा मेरठमध्ये अपघात झाला. मेरठच्या आयुक्तांच्या घराजवळ हा अपघात झाला असून प्रवीणच्या गाडीला एका मोठ्या ट्रकने टक्कर दिली. हा ट्रक वेगात असल्यामुळे प्रवीणच्या लॅन्ड रोव्हर (Range Rover) गाडीचे चांगलेच नुकसान झाले. पण गाडीतील दोघांना कुठलीच दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली आणि चालकाला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली.
अपघाताविषयी माध्यमांना माहिती देताना प्रवीण कुमार म्हणाला, “हा अपघात अजून भयानक होऊ शकत होता. पण आम्ही सुखरूप आहोत, यासाठी देवाचे आभार. मी माझ्या पुतण्याला सोडवण्यासाटी गेलो होतो. तेव्हाच एका मोठ्या ट्रकने रात्री 9.30च्या सुमारास गाडीला मागून टक्कर दिली. गाडी मोठी असल्यामुले आम्ही वाचलो. आधी मला वाटले की बंपर तुटला असेल, पण गाडीचे चांगलेच नुकसान झाले आहे.”
दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर सिवील लाईन्स पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तत्काळ त्याठिकाणी पोहोचले. एसपी पियुष कुमार यांनी याविषयी माहिती दिली की, “ट्रक चालकाला पकडून पोलिस ठाण्यात पाठवले आहे.” एसपींच्या माहितीनुसार प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा सुरक्षित आहे. माहितीनुसार अपघातासाठी ट्रक चालक जबाबदार असून त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. तत्पूर्वी 2007 मध्येही प्रवीण कुमार एका अपघाताचा शिकार झाला होता. त्यावेली वेगवान गोलंदाज एका ओपण जीपमधून बाहेर पडला होता.
प्रवीण कुमारच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने भारतासाठी 6 कसोटी, 68 वनडे आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 77, कसोटीमध्ये 27, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 विकेट्सची नोंद आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने 119 सामन्यात 90 विकेट्स घेतल्या आहेत. (Praveen Kumar explained the reason for saving his life in the terrible accident)
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज
BREAKING । तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघातून अँडरसनचा पत्ता कट