---Advertisement---

भारतीय पठ्ठ्या चमकला! तिरंदाजीत प्रवीण जाधवने प्रतिस्पर्ध्याला ६-० ने चारली धूळ; मिळवला पुढच्या फेरीत प्रवेश

On: बुधवार, जुलै 28, 2021 12:53 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) आनंदाची बातमी येत आहे. पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड ३२ मध्ये भारतीय प्रवीण जाधवने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या गलसान बाझरझापोव्हचा ६-० ने पराभव केला आहे. यासोबतच त्याने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

यावेळी त्याने गलसानला २९-२७, २८-२७ आणि २८-२४ अशी धूळ चारली आहे. (Pravin Jadhav knocks OUT World No. 2 Galsan Bazarzhapov 6-0 in 1st round of Men’s Individual event)

साताऱ्याच्या प्रवीण जाधवचा पुढील सामना आजच १.२२ वाजता होणार आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना

-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---