तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून क्रिकेट प्रेमी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत आहे.
सध्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या आधी तिरुअनंतपुरम या शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना या शहरात झाला नाही. त्याचमुळे क्रिकेटप्रेमी सामन्यात पाऊस न पडण्यासाठी या शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या पजवंगाडी गणपती मंदिरात वरूण देवाकडे प्रार्थना करत आहेत.
आज सकाळपासूनच या मंदिरात गर्दी झाली आहे आणि लोक मंदिरात नारळ वाहताना एकच प्रार्थना करत आहेत की आजचा सामना निर्विघ्न पार पडावा. सकाळी मंदिरात आलेल्या एका युवकांचा गट म्हणाला “हा ईश्वराचा देश आहे आणि ईश्वर दयाळू आहे. या शहरात ३० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. इथे जेव्हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता. त्याचबरोबर आमचाही झाला नव्हता.”
तिरुअनंतपुरम या शहरातील द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. या मैदानात पावसाचे पाणी काढण्यासाठी उत्तम सुविधा आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर मैदान १० मिनिटानंतर खेळण्यासाठी तयार होऊ शकते अशी सुविधा करण्यात आली आहे.
या सामन्याचे जवळजवळ सगळे तिकिट्स संपले आहेत. या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. यातील ४० हजार तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
Pazhavangadi Ganapathy #Temple in Kerala pic.twitter.com/kpB0ghiFeH
— Host My Holidays (@hostmyholidays) December 30, 2016