---Advertisement---

नवा कोच, नवा कर्णधार: ‘या’ संघाचा आयपीएल २०२०मध्ये असणार रुबाब काही खास

---Advertisement---

किंग्ज इलेव्हन पंजाब हा आयपीएलमधील एक चांगला संघ आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही या संघाची सहमालक आहे. या संघाने एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने फक्त एकदाच आयपीएल 2014 मध्ये अंतिम सामना खेळला होता. मात्र, आयपीएल 2020 मध्ये हा संघ पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्याच्या स्वप्नासह मैदानात उतरेल.

नवीन कर्णधार व प्रशिक्षकाची केली नियुक्ती

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून किंग्ज इलेव्हन पंजाबने बर्‍याच खेळाडूंना आपला कर्णधार बनवले आहे, परंतु कोणत्याही कर्णधाराला या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही.

मागील दोन हंगामात आर अश्विन याने संघांचे नेतृत्व केले होते. परंतु 2019 मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात दिल्ली संघाने अश्विनला आपल्या संघात घेतले. आता किंग्ज इलेव्हन संघ आयपीएल 2020 मध्ये नवीन कर्णधारासह मैदानात उतरेल. युवा सलामीवीर फलंदाज केएल राहुलला या हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. त्याचबरोबर त्यांनी माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

मंगळवारी प्रीती झिंटाने एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये प्रीती म्हणाली, “किंग्स इलेव्हन संघात सहभागी होणाऱ्या सर्वांना नमस्कार, मला आपणा सर्वांना सांगायचं आहे की आपण यावेळी छान दिसत आहात. आपण सर्व कसे कठोर परिश्रम करीत आहात हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकते. खरं तर, मी क्वारंटाईनमधून आणि बायो-बबलमधून बाहेर पाडण्याबाबत फार उत्सुक आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---