---Advertisement---

एकदम कडक! प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने सलमान खानला दिले सडेतोड प्रत्युत्तर, २०१४ मध्ये विचारला होता प्रश्न

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 7:23 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रविवारी (१८ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. आयपीएलच्या या हंगामात पंजाब संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबईवर मिळालेल्या विजयानंतर प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने धमाकेदार आनंद साजरा केला. आणि आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

मजेशीर गोष्ट अशी की, पंजाब संघाने बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या सहा वर्षांपूर्वीच्या ट्वीटवर निशाना साधला.

सलमान खानने सहा वर्षांपूर्वी ट्वीट करत “झिंटा संघ जिंकला का?”, असा प्रश्न विचारला होता. हा ट्वीट त्याने २८ मे २०१४ रोजी केला होता. यावर प्रत्युत्तर देत पंजाबने सोमवारी (१९ ऑक्टोबर) लिहिले की, “हो”.

मुंबई इंडिन्यसला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभूत केल्यानंतर पंजाब संघाला त्यातून २ गुण मिळाले. आयपीएलच्या या हंगामात पंजाब संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी केवळ ३ सामने जिंकले आहेत. आता पुढे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपल्या उर्वरित ५ सामन्यांपैकी कमीत कमी ४ सामने जिंकावे लागणार आहेत.

पंजाब संघाचा पुढील सामना मंगळवारी (२० ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुपर ओव्हरही टाय झाली तर पुढची सुपर ओव्हर कशी टाकायची? ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम

‘थाला फक्त एकच…’, चाहत्याच्या कमेंटवर केएल राहुलचे भन्नाट प्रत्युत्तर

-‘मिस्ट्री गर्ल’! पंजाब वि. मुंबई सामन्यात व्हायरल झालेली मुलगी आहे तरी कोण? स्वत: वर बनलेले मिम्स केले शेअर

ट्रेंडिंग लेख-

-सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?

-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…

-सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---